
5 जुलै 2016 ला शासनाने (पणन व वस्त्रोद्योग विभाग) शेतमालावर शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी अडत बंद करून ती खरेदीदाराकडून घेण्याचे लागू झालेले आदेश येथील बाजार समितीत ते 18 जुलै 2016 पासून लागू झालेत.
अमरावती : बाजार समितीच्या फळ व भाजीपाला यार्डात तक्रारदार शेतकऱ्यास देण्यात आलेली शेतमाल विक्रीची पट्टी बनावट असल्याचे बाजार समितीने सांगितले आहे. यावरून भाजीपाला बाजारात अडते बनावट पट्टी व बिलाच्या माध्यमातून दलालीचा गोरखधंदा करतात, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाकडे निरीक्षकांचे दुर्लक्ष कसे झाले? हा प्रश्न त्याहूनही गंभीर बनला आहे. निरीक्षक व भाजीपाला बाजाराचे इनचार्ज यांचे संगनमत आहे का? असाही प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
हेही वाचा - धक्कादायक! भोंदूबाबाचा एकाच घरातील चौघींवर बलात्कार, भूत उतरविण्याचा केला होता बहाणा
5 जुलै 2016 ला शासनाने (पणन व वस्त्रोद्योग विभाग) शेतमालावर शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी अडत बंद करून ती खरेदीदाराकडून घेण्याचे लागू झालेले आदेश येथील बाजार समितीत ते 18 जुलै 2016 पासून लागू झालेत. त्यानुसार धान्य, फळे व भाजीपाला यार्डात निरीक्षकांसह अडत्यांना सूचना देण्यात आल्या. अडत्यांना त्यांच्याकडील पट्टेबुक व बिलबुक बाजार समितीकडून प्रमाणित करून घेण्याचे बंधन आहे. काही अडत्यांनी मात्र बनावट पुस्तके छापल्याचे आता उघडकीस येऊ लागले आहे. तक्रारदार शेतकऱ्यास देण्यात आलेली पट्टी प्रमाणीत पुस्तकातील नसल्याने बनावट पुस्तकातील आहे, हे स्पष्ट झाल्याने अवैध दलालीचा व्यवसाय उघडकीस आला आहे.
हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली
बनावट पुस्तक छापून ऍडव्हांसच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून शेकडा आठ टक्के अडत वसूल करण्याचा प्रकार गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. भाजीपाला व फळबाजारात दररोज 60 लाख रुपयांच्या जवळपास आर्थिक उलाढाल होते. यातून बाजार समितीला सरासरी दररोज साठ हजार रुपये सेसच्या माध्यमातून उत्पन्न होते. हा सर्व व्यवहार उजळ माथ्याने होत असला तरी त्यामागे दलालीचा काळाधंदाही राजरोस सुरू आहे. येथील अडते खरेदीदारांकडून सहा ते आठ टक्के अडत वसूल करीत असून तितकीच दलाली मनाई असतानाही शेतकऱ्यांकडून अडत घेण्याचा प्रकार सुरू आहे. दोन्ही बाजूने अडते जवळपास सोळा टक्केच्या जवळपास दलाली घेत आहे. या माध्यमातून रोज दहा लाख रुपयांवर दलालीचा गोरखधंदा सुरू आहे.
भाजीपाला व फळबाजारात हा गोरखधंदा सुरू असताना निरीक्षकांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष कसे होते? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
हेही वाचा -
बनावट बुक कसे आढळले नाहीत? -
अडत्यांकडील बिलबुक व पट्टीबुक तपासण्याची जबाबदारी निरीक्षकांवर असताना त्यांना बनावट बुक कसे आढळले नाहीत. दररोज शेतकरी बाजारात लुटले जात असताना निरीक्षकांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.