Free support of Shri Samarth Group for medical and engineering entrance examinations
Free support of Shri Samarth Group for medical and engineering entrance examinations

वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशपरीक्षेसाठी श्री समर्थ गृपचा निःशुल्क उपक्रम

अकोला : सध्या कोरोना व्हायरसमुळे राज्यातीलच नव्हे, तर देशातील जनजीवन ठप्प झाल्याचे चित्र आहे. शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन विद्यार्थिहितासाठी अग्रेसर असणाऱ्या प्रा. नितीन बाठे यांनी आपल्या श्रीसमर्थ कोचिंग क्लासेसतर्फे MHT-CET, (MATHS &  BIO Group), NEET, JEE MAINS, JEE ADVANCED या परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या एका विनामूल्य अभिनव उपक्रमाची चर्चा सध्या सगळीकडे होतेय. राज्यभरातील विद्यार्थी आणि पालक श्री समर्थ कोचिंग क्लासच्या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करीत आहेत.

सध्या जागतिक पातळीवर पसरलेल्या ‘कोरोना’ नावाच्या व्हायरसचा धसका सर्वच देशांनी घेतला आहे. भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने अनेक प्रतिबंध लागू केले आहेत आणि त्याचे पालनही सर्वच नागरिक करीत आहेत. नियमित शाळा-कॉलेजांना सरकारने सुटी जाहीर केली आहे. पण, यात MHT-CET, (MATHS &  BIO Group) NEET, JEE MAINS, JEE ADVANCED या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांचे या पंधरा दिवसांच्या सुटीत शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी प्रा. नितीन बाठे यांनी आपल्या श्रीसमर्थ कोचिंग क्लासच्या www.samartheducation.org या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेंतर्गत दररोज सकाळी चारही परीक्षांवर आधारित पेपर अपलोड करण्यात विद्यार्थ्यांनी हे पेपर परीक्षेच्या निर्धारित वेळेनुसारच सोडवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी या पेपरच्या उत्तरपत्रिका व नवीन चार पेपर्स अपलोड करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी या उत्तरपत्रिकांवरून आपण सोडविलेल्या उत्तरपत्रिका पडताळून पाहायच्या आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना हे पेपर व्हॉट्सॲपवर हवे असतील त्यांनी आपले नाव व मोबाईल क्रमांक 8793617030. या व्हॉट्सअॅप नंबरवर नोंदवावेत. JEE ADVANCED च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी 8793617030 या मोबाईल क्रमांकावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त वरील चारही परीक्षा देणाऱ्या राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्याला अभ्यासक्रमासंदर्भात काहीही अडचण आल्यास ते आपले प्रश्न anyproblem8to12@gmail.com या मेल आयडीवर किंवा 8793617030 या मोबाईल नंबरवर पाठविल्यास चोवीस तासांचे आत त्यांच्या शंकांचे निरसन करण्याची सोय प्रा. नितीन बाठे यांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी केली आहे, हे उल्लेखनीय. 
नवीन तंत्रज्ञान, मोबाईल, इंटरनेट याबद्दल अनेक उलट-सुलट चर्चा होताना दिसतात. मात्र, त्याच तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून MHT-CET,  (MATHS &  BIO Group), NEET, JEE MAINS, JEE ADVANCED या परीक्षांना बसलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या, कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीचे निवारण करण्यात आपली खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रा. नितीन बाठे यांचे अभिनंदन करायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com