
अमरावती : आजच्या स्पर्धात्मक युगात लहानपणापासूनच आपल्या मनावर शिकून नोकरी करण्याचे संस्कार टाकले जातात. मात्र अशाही वातावरणात काही तरुण हातची चांगल्या पॅकेजची नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायाला उभारी देत समाजात आपला स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवितात. तरुणांसाठी एक आदर्श ठरणारे अमरावतीच्या समीर मोहनराव पत्रे या ३० वर्षीय युवा उद्योजकाने ही किमया साध्य केली.