esakal | वादळी पावसानं ५२ हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त, ४५ गावातील वीजपुरवठा खंडीत
sakal

बोलून बातमी शोधा

फळबागांचे नुकसान

वादळी पावसानं ५२ हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त, ४५ गावातील वीजपुरवठा खंडीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात बुधवारी (ता. 14) रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. संत्रा, आंबा, लिंबू, मका या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळल्याने जिल्ह्यातील 45 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. यात महावितरणचे 26 लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले.

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वाऱ्याने फळबागा मोठ्या प्रमाणात उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. शेतातले झाडे उन्मळून पडली. त्यामुळे फळबागाकडून असलेल्या उत्पन्नाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. वादळी वाऱ्याने जिल्हाभरात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी सध्या फळबाग फुलविल्या आहे. यात संत्रा, आंबा, शेवंगा, मका, तीळ, लिंबू आदी पिकांचा समावेश आहे. उन्हाळ्यात संत्रा, आंबा तसेच लिंबू या पिकांना मोठी मागणी असते. फळ तोडणीवर आले असतानाच वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वादळीवाऱ्याने जिल्ह्यातील 52 हेक्‍टरवरील फळबागा प्रभावित झाल्या आहेत. यात सर्वाधिक नुकसान संत्रा पिकांचे झाले आहे. जवळपास 25 हेक्‍टरवरील पीक उद्‌ध्वस्त झाले आहे. 13 हेक्‍टरवरील लिंबू पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - नागपूरकरांना ना संचारबंदी, ना जमावबंदी, ना कोरोनाची भीती; नागरिक बिनधास्त रस्त्यांवर

दोन हेक्‍टरवरील आंबा, एक हेक्‍टरवरील शेवंगा, अडीच हेक्‍टरवरील मका, नऊ हेक्‍टरवरील तिळाला फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान नेर, आर्णी, बाभूळगाव तालुक्‍यातील झाले आहे. अजूनही पंचनामे सुरू आहे. आतापर्यंत केवळ 14 तालुक्‍यातील आकडेवारी प्राप्त झाली आहे. अजूनही दोन तालुक्‍यातील नुकसानाचा प्राथमिक अहवाल आलेला नाही. कृषी विभागासोबत महावितरणलाही मोठा शॉक बसला आहे. वादळी वाऱ्याने बुधवारी (ता.14) जिल्ह्यातील जवळपास 45 गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीतून अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. वादळामुळे महावितरणला 26 लाखांचे नुकसान झाले आहे. 17 किलोमीटरची हायव्होल्टेज लाइन क्षतिग्रस्त झाली. 42 किलोमीटरची एलटी वाहिनीचे नुकसान झाले. तीन ट्रान्सफार्मर पडले तर आठ रोहीत्रे फेल झाले. एचटी वाहिनीचे 53 तर एलटी वाहिनीचे तब्बल 201 वीज खांबांचे नुकसान झाले. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनसह कृषी तसेच महावितरणलाही फटका बसला आहे.

हेही वाचा - भीषण वास्तव! सभोवताली मृतदेहांची गर्दी अन् हाताळणारे फक्त चारच जण