कत्तलखान्यांना पूर्णविराम, गुन्हेगारांत दशहत

अनिल कांबळे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

नागपूर : पोलिस उपायुक्‍त अभिनाश कुमार यांनी जुनी कामठी शहराचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलला आहे. धार्मिक दंगलीसाठी कामठीचे नाव प्रथम स्थानावर होते. तसेच कुख्यात गुंडांचे माहेरघर म्हणून कामठीकडे गुन्हेगारी जगत पाहत होते. तसेच सर्वांत मोठा कत्तलखाना कामठीत गेल्या दशकांपासून सुरू होता. मात्र, डीसीपी अभिनाश कुमार यांनी उपायुक्‍तांचा पदभार घेताच गुन्हेगारांमध्ये एकच दहशत निर्माण झाली. तसेच कत्तलखानासुद्धा बंद झाला. आज त्या कत्तलखान्यासमोर मुलांसाठी मैदान तयार झाले आहे. तसेच बिट सिस्टममुळे पोलिसांचा दबदबा, वर्चस्व आणि तगडा जनसंपर्क निर्माण झाला आहे.

ठाण्याची ओळख
इंग्रजांच्या राजवटीत 1927 मध्ये जुनी कामठी पोलिस ठाण्याची स्थापना झाली. जयेश भांडारकर हे ठाणेदार असून, पुंडलिक मेश्राम हे पोलिस निरीक्षक (गुन्हे) म्हणून कार्यरत आहेत. येथे 78 पोलिसांचा ताफा असून त्यामध्ये 3 सहनिरीक्षक तर 3 पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. मिलिटरी फोर्समधील देशातील "गरूड रेजीमेंट'चे मुख्यालय जुनी कामठीत आहे. मिलिटरीचे ब्रिगेडियर दर्जाचे अधिकारी येथे आहेत. "चावडी चौक' अशी नवी ओळख जुनी कामठी पोलिस ठाण्याला आहे.

1. कामठी टाउन बिट
इन्चार्ज- सुहास चव्हाण (सहायक पोलिस निरीक्षक)
मो. 8108102003
एकूण कर्मचारी - 10
गुन्हेगार - 5
लोकसंख्या - 70 हजार
 

बिटच्या सीमा
गरूड चौक, कन्हान नदी पूल, महादेव गार्ड, न्यू खलासी लाइन, अजनी क्रॉसिंग, मोटर स्टॅंड चौक

महत्त्वाची ठिकाणे
न्यू खलासी लाइन, मोदी पडाव, राम मंदिर, कादर झेंडा, कमसरी बाजार, भाजीमंडी, दाल ओली, बकरा कमेला, कसाई पुरा, गोयल चौक, सोनार ओली, शुक्रवारी बाजार आणि सत्तू हलवाई चौक

2. छावनी बिट
इन्चार्ज - संतोष डाबेराव (सहायक पोलिस निरीक्षक)
मो. 9923050800
कर्मचारी - 9
गुन्हेगार - 5
लोकसंख्या - 20 हजार

बिटच्या सीमा
कमसरी बाजार ते कळमना टी-पॉइंट, इस्माईलपुरा ते बुनकर कॉलनी, गवळीपुरा ते कामगारनगर.
 

प्रमुख ठिकाणे
गोऱ्हा बाजार, खापरखेडा टी-पॉइंट, कन्हान नदी, खैरी गाव, हनुमान मंदिर-खापरखेडा.

पोलिसांसमोरील समस्या
अवैध जनावरांची वाहतूक आणि कत्तलखाना या मुख्य समस्या जुन्या कामठीत होत्या. यासोबत कुख्यात गुन्हेगारांची दहशत कामठीत अजूनही आहे. धार्मिक दंगली होत नसल्या तरी धार्मिकबाबतीत पोलिसांना आजही सतर्क राहावे लागते. गावठी पिस्तूल तसेच अमली पदार्थाच्या विक्रीवर पोलिसांना अंकुश ठेवावा लागेल. महामार्ग असल्यामुळे अपघात रोकण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्‍यक आहेत. चोरटी वाळू वाहतूक याकडे पोलिसांना लक्ष द्यावे लागेल.

पोलिस आणि नागरिकांमधील सुसंवाद वाढला. आज धार्मिकबाबतीत समित्या स्थापन केल्या आहेत. मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध बांधवांमध्ये योग्य समन्वय आहे. त्यामुळे आज पोषक असे वातावरण तयार झाले आहे. डीसीपी अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनामुळे आज स्थिती नियंत्रणात आहे.
- जयेश भांडारकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
मो. 9823052100

Web Title: fullstop to nagpur slaughter houses