esakal | लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल

लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

झरी जामनी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील पिवरडोल येथे वाघाच्या हल्ल्यात (tiger attack news) अविनाश पवन लेनगुरे (वय १७) याचा मृत्यू झाला. अविनाश हा रात्री ९ वाजताच्या सुमारास शौचास गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला होता. लेखी आश्वासनानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Funeral-on-Avinash-after-written-assurance)

अविनाशच्या बहिणीला वनविभागात सध्या कंत्राटी तत्त्वावर व भरती निघाल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. कुटुंबाला शासकीय नियमानुसार निधी, जगलाल कंपाउंड, वाघाचा चार दिवसांत बंदोबस्त करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. हल्लेखोर वाघ त्याच परिसरात फिरतो आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी नऊ वाजता पिवरडोल येथे पेंच येथील १ व अमरावती येथील २ रेस्क्यू टीम दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा: ‘ट्विट’वार : आम्ही कशाला म्हणणार ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’

वाघाचे लोकेशन घेण्यासाठी वनविभागाने तीन पथके तयार केले आहेत. वन कर्मचारी व वनमजूर पिवरडोलच्या आसपास तैनात आहेत. वाघ हा मांडवी शिवारात आढळलेला ‘रंगीला’च आहे, असा कयास लावला जात आहे. वाघाच्या हल्ल्याने गावकरी भयभीत झाले असून, दोन दिवसांपासून शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे.

झरी तालुक्यातील ही एकच घटना नसून आतापर्यंत कितीतरी नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. गावाकऱ्यांत प्रशासनाच्या हलगर्जी धोरणाबाबत मोठ्या प्रमाणात आक्रोश पाहायला मिळत आहे. घटना घडल्यानंतर वाघाला हुसकवण्यात आले. त्यानंतर लगेच पिवरडोल शिवरातच एका गाईचा फडशा पाडण्यात आला. ही गाय करनू दिलीप वड्डे (रा. निंबादेवी) यांची आहे.

(Funeral-on-Avinash-after-written-assurance)

loading image