esakal | ‘ट्विट’वार : आम्ही कशाला म्हणणार ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’
sakal

बोलून बातमी शोधा

‘ट्विट’वार : आम्ही कशाला म्हणणार ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’

‘ट्विट’वार : आम्ही कशाला म्हणणार ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नेते म्हटलं की एकमेकांवर चिखलफेक करणारच. यात काही नवीन नाही. निवडणुकीची प्रचार सभा असो, एखादा कार्यक्रम असो किंवा सोशल मीडिया. विरोधकांना धारेवर धरण्याचा एकही चान्स नेते सोडत नसतात. यामुळेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या (Chandrakant Patil) जातात. एखादी गोष्ट म्हणून मी तसे म्हटले नाही किंवा जे बोलायचे नाही तेच बोलून मी अस (Devendra Fadnavis) म्हणणार नाही, असं म्हणणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. याचाच परिचय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे ट्विट (Congress state president Nana Patole) पाहून आला. (Nana-Patole-tweet-addressed-to-Chandrakant-Patil-and-Devendra-Fadnavis)

राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे. ते सरकारला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. ओबीसीचे आरक्षण असो किंवा ईडीची कारवाई आलेला मुद्दा हातून जाता कामा नसे त्यांचा प्रयत्न असतो.

हेही वाचा: आदेश सुस्‍पष्ट असतानाही सत्ताधारी, विरोधकांकडून ओबीसींची दिशाभूल

महाविकासआघडीचे सरकार असो किंवा कोणता मंत्री त्यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी ते सोडत नसल्याचे दिसत आहे. भाजपचे नेते पातळी सोडून सरकारमधील नेत्यांवर तोंडसुख घेत असल्याचे सद्या दिसून येत आहे. त्यांनी पातळी सोडली तरी आम्ही आमची संस्कृती सोडणार नाही.

चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’ म्हणणार नाही, असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे. विशेश म्हणजे हे ट्विट त्यांनी चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांना टॅगही केले आहे. तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणुकीचे पाप झाकता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

(Nana-Patole-tweet-addressed-to-Chandrakant-Patil-and-Devendra-Fadnavis)

loading image