दीर्घ प्रतीक्षेनंतर पत्नीच्या गैरहजेरीतच पतीवर केले नातेवाईकांनी अंत्यसंस्कार

The funeral took place in Chandrapur district without a wife
The funeral took place in Chandrapur district without a wife

सावली (जि. चंद्रपूर) : नाव रूपेश रामटेके... राहणार चंद्रपूर जिल्ह्यातील बोरचांदली... नाव कविता भडके... राहणार खेडी... यांचे बारा वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांच्या संसारवेलीवर फुलही उमलली. पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवायचे... मिळणाऱ्या मिळकतीत त्यांचा आनंदी संसार सुरू होता. मात्र, सुखी संसारात विघ्न लागले अन्‌ कविता यांना तेलंगणात मजुरी करावी लागली. मजुरी करीत असताना तिच्यापर्यंत एक बातमी पोहोचली आणि होत्याचे नव्हते झाले... कोरोनामुळे काळजाला चिरे पाडणारी घटना घडली मूल तालुक्‍यातील बोरचंदाली येथे... 

रूपेश आणि कविता यांचे बारा वर्षापूर्वी लग्न झाले झाले. दोन्ही पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होते. मिळणाऱ्या मिळकतीतून दोन पैसे जमा करीत होते. मात्र, नियतीला त्यांचा आनंद पाहावला गेला नाही आणि त्यांच्या सुखी संसारात विघ्न आले. रूपेश यांना असाध्य आजाराने ग्रासले. प्रकृती खराब झाल्याने रूपेश यांना काम करणे शक्‍य होत नव्हते. यामुळे कुटुंबाची जबाबदारी कविता यांच्यावर आली. 

पतीची प्रकृती, औषधांचा खर्च, मुलांचा सांभाळ व कुटुंबाची जबाबदारी या साऱ्यांचा समतोल साधत कविता या दिवसभर राबायच्या. शेतीचा हंगाम झाला. यानंतर गावात काम मिळेनासे झाले होते. त्यामुळे घर कसे चालवायचे असा प्रश्‍न त्यांच्या मनात घर करून गेला. रोजगाराच्या शोधात असताना कविता यांना तेलंगणात मिरचीतोडीचा हंगाम सुरू असल्याची माहिती मिळाली. चांगली रक्‍कम हाती येईल आणि कुटुंबाचा व औषधांचा खर्च भागेल यासाठी कविता यांनी तेलंगणा गाठले. 

दोन महिने तेलंगणात राहून त्यांनी थोडाफार पैसाही जम केला. पैसा गोळा केल्याने त्या आनंदी होत्या. पतीवर आता उपचार करणे शक्‍य होईल असे त्यांना वाटत होते. मात्र, चिनमधून आलेल्या कोरोनाने देशात धडक दिल. कोरोनाचे वादळ धडकल्याने देशभरात लॉकडाऊन झाले आणि कविता तेलंगणातच अडकल्या. इकडे त्यांच्या पतीचे निधन झाले. लॉकडाऊनमुळे त्यांना घरी परत येता आले नाही. शेवटी कविता यांच्या गैरहजेरीतच नातेवाइकांनी रूपेश यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे अंतिम संस्काराला उपस्थित गावकऱ्यांनाचेही मन भरून आले.

सर्व प्रयत्न ठरले निष्फळ

कविता या मिरचीतोड कामगार म्हणून तेलंगणात गेल्या असताना एक बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली. ती होती पत्नीच्या निधनाची. शेवटचा श्‍वास घेताना पत्नी कविता पती रूपेश यांच्याजवळ नव्हती. पतीचे शेवटचे दर्शन व्हावे, यासाठी कविता यांची धडपड सुरू झाली. मात्र, तिथे तिचे कुणीच ऐकून घेतले नाही. लॉकडाऊन व कुणीही सहकार्य न केल्यामुळे कविता तिथेच अडकल्या. बरीच बाट पाहून त्या न आल्याने गैरहजेरीतच नातेवाइकांनी रूपेश यांच्यावर अंत्यसंस्कार केले. पतीसाठी राबणारी पत्नीच शेवटच्या क्षणी पतीला भेटू शकली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com