Gadchiroli News : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; लोकसभा निवडणूक ; ४ जून रोजी सकाळी ८ वाजता होणार प्रारंभ

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी आणि चिमूर या सहा विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी होणार आहे.
gadchiroli administration ready for vote counting Lok Sabha Elections 2024 on June 4
gadchiroli administration ready for vote counting Lok Sabha Elections 2024 on June 4Sakal

गडचिरोली : लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल २०२४ रोजी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाकरिता झालेल्या मतदानाची मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून कृषी विद्यापीठाच्या इमारतीत सुरु होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी आणि चिमूर या सहा विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरिता १४ टेबल याप्रमाणे सहा विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण ८४ टेबल लावण्यात आले आहेत.

तसेच टपाल मतपत्रिकेच्या मतमोजणीसाठी १२ टेबल व इलेक्ट्रॉनिकली ट्रांसमिटेड पोस्टल बैलेट सिस्टम (ईटीपीबीएस) साठी एक टेबल असे एकूण ९७ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक मतदार संघनिहाय व प्रत्येक टेबलनिहाय मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून एकूण ११७ मतमोजणी पर्यवेक्षक,

१३० मतमोजणी सहायक, १२० सुक्ष्म निरीक्षक व इतर १०१ सहायक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराला इव्हीएम मतमोजणी, इटीपीबीएस व पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी एका टेबलसाठी एक याप्रमाणे ९७ प्रतिनिधी नेमता येणार आहेत. त्यासाठी फॉर्म१८ भरणे आवश्यक आहे.

मतमोजणी कक्षात प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधीसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.मतमोजणीस्थळी उमेदवारांच्या प्रतिनिधींकरिता कम्युनिकेशन कक्ष, पत्रकारांसाठी मीडिया कक्ष तसेच उमेदवारांकरिता कक्ष स्थापन केलेला असून सर्व कक्ष सुसज्ज आहेत. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली राहणार आहे.

वीजपुरवठा अखंड सुरू राहावा यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने तसेच भारतीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले दोन निवडणूक निरीक्षक, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडणार आहे.

मतमोजणीस्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेची देखरेख आहे. यात बाह्य स्तरावर महाराष्ट्र पोलिस दल, दुसऱ्या स्तरावर राज्य राखीव पोलिस दल तर आतील स्तरावर केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. मतमोजणी कक्षात मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु, तसेच निवडणूक आयोगाने प्रतिबंध केलेल्या वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

विधानसभानिहाय मतमोजणीच्या फेऱ्‍या...

आमगाव विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्‍या, आरमोरी मतदारसंघात २२ फेऱ्‍या, गडचिरोलीकरिता २६ फेऱ्‍या, अहेरीकरिता २१ फेऱ्‍या, ब्रह्मपुरीकरिता २३ फेऱ्‍या आणि चिमूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्‍या राहणार आहेत. यासोबतच प्रत्येक विधानसभा मतदार संघातून सोडत पद्धतीने निवडलेल्या प्रत्येकी ५ व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com