

Gadchiroli News
esakal
गडचिरोली: महाराष्ट्र विमान विकास कंपनीला गावकऱ्यांनी सर्वेक्षण करू दिले नसतानाही जिथे ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केला त्याच हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर चक या भागाला प्रस्तावित विमानतळासाठी ‘योग्य’ ठरवत तडकाफडकी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संबंधित गावकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. हा एक प्रकारे आमच्याशी झालेला धोका आहे, अशा प्रतिक्रिया संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. सरकारच्या या भूमिकेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारीही गावकऱ्यांनी सुरू केली आहे.