Gadchiroli Accident: ट्रकच्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार
Truck Accident: गडचिरोलीतील दुचाकी–ट्रक अपघातात दोन सख्खे भाऊ जागीच ठार; अपघाताचे कारण खड्डे आणि ट्रकची धडक. पोलिसांनी ट्रक चालक ताब्यात घेतला; तपास सुरू आहे, दुर्घटनेत दोन्ही कुटुंबाची शोककळा पसरली आहे.
गडचिरोली : स्थानिक गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्लॅटिनम ज्युबिली स्कूलजवळील फरीद बाबांच्या दर्ग्यापुढे मंगळवार (ता. १४) दुपारी १२. ३० वाजता ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले.