Gadchiroli Bus Accident : बस फलाट ओलांडून प्रवाशांमध्ये घुसली; अचानक झाले ब्रेक फेल, तिघे जखमी
Bus Break Failure Accident : गडचिरोली एसटी आगारात ब्रेक फेल झालेल्या बसने फलाट ओलांडून प्रवाशांच्या गर्दीत घुसून तिघे जखमी झाले. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
गडचिरोली : गडचिरोली शहरातील एसटी आगारातील ब्रेक फेल झालेली एक बस अचानक फलाट ओलांडून प्रवाशांच्या गर्दीत गेल्याने एक लहान मुलासह दोन महिला जखमी झाले. ही घटना रविवार (ता. १०) दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली.