

Complaint Filed Against Jesa Motwani in DesaiGanj
Sakal
गडचिरोली : नगर परीषदेच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्या संवादाचे रेकॉर्डिंग व्हायरल केल्याचा प्रकार देसाईगंजात घडला आहे. याबाबत देसाईगंज नगर परीषदेचे उमेदवार तसेच काॅंग्रेस सोडून राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) चे जेसा मोटवानी यांच्याविरुद्ध तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी देसाईगंज ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.