गडचिरोली : चक्क डॉक्टर लावत होता नक्षलवाद्यांचे बॅनर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

गडचिरोली : चक्क डॉक्टर लावत होता नक्षलवाद्यांचे बॅनर

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान पोलिसांनी नक्षलविरोध शोधमोहीम तीव्र करत रेपनपल्ली परिसरात नक्षल्यांचे बॅनर लावताना तिघांना अटक केली. यात पवनकुमार फकीरचंद उईके (रा. कमलापूर, ता. अहेरी, जि. गडचिरोली), प्रफुल्ल देवानंद बट (रा. वरुड ता. मारेगाव, जि. यवतमाळ), अनिल गोकुळदास बट (रा. कमलापूर, ता. अहेरी, जि. गडचिरोली) यांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे पवनकुमार हा एमबीबीएस डॉक्टर आहे.

रेपनपल्ली परिसरात पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवत असताना गुरुवारी रात्री कमलापूर-दामरंचा जाणाऱ्या मुख्य मार्गावर पवनकुमार उईके, प्रफुल्ल बट व अनिल बट हे नक्षल बॅनर लावताना आढळले. तिघांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने तीनही आरोपींना ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आली.

आधीपासूनच संबंध की दबाव?

पवनकुमार उईके हा एमबीबीएसचे शिक्षण घेतलेला डॉक्टर असून तो कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होता. उच्च शिक्षित डॉक्टर आधीपासूनच नक्षलवाद्यांशी संबंधित होता काय, त्याच्यावर नक्षलवादाचा प्रभाव होता की, या अतिदुर्गम भागात नक्षल्यांच्या दबावामुळे नाइलाजाने तो हे काम करत होता, ही माहिती आता पोलिस तपासातच उघड होणार आहे.

Web Title: Gadchiroli Doctor Putting Naxalists Banner Accused Arrested By Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..