Gadchiroli News : प्रजासत्ताकदिनाच्या पथसंचलनात गडचिरोली, गोंदिया सी – ६० पथक अव्वल

प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत २६ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या पथसंचलनात भाग घेतलेल्या पथकांमधील उत्कृष्ट पथसंचलन केलेल्या पथकांना शासनातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
gadchiroli-gondia-c-60-squad-first-best-conduct-on-26-january 2024
gadchiroli-gondia-c-60-squad-first-best-conduct-on-26-january 2024 Sakal

गडचिरोली : प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत २६ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या पथसंचलनात भाग घेतलेल्या पथकांमधील उत्कृष्ट पथसंचलन केलेल्या पथकांना शासनातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

त्याकरिता गठित करण्यात आलेल्या निवड समितीने उत्कृष्ट पथसंचलनासाठी अनुक्रमे प्रथम क्रमांक गडचिरोली आणि गोंदिया सी-६० पथक, द्वितीय क्रमांक राज्य राखीव पोलिस दल व तृतीय क्रमांक बृहन्मुंबई पोलिस दंगल नियंत्रण पथक अशा तीन पथकांची निवड करण्यात केली आहे.

गडचिरोली पोलिस दल व गोंदिया पोलिस दलाच्या सी – ६० पथकाने संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट पथसंचलन करून २६ जानेवारी २०२४ रोजी शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या प्रजासत्ताकदिनाच्या पथसंचलनामध्ये प्रथम क्रमांक पटकविला. त्याबद्दल सर्व स्तरातून गडचिरोली पोलिस दलाचे अभिनंदन केले जात आहे.

प्रजासत्ताकदिन पथसंचलनामध्ये सर्वोत्कृष्ट पथसंचलन करणा­ऱ्या पथकांना सोमवार (ता. २९) अपर पोलिस महासंचालक (प्रशासन) यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. गडचिरोली पोलिस दलाचे सी –६० पथके माओवादविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असतात त्यासोबतच पथसंचलनामध्येदेखील त्यांनी आपल्या शिस्तीचे आणि एकजुटीचे प्रदर्शन घडविले आहे.

त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पथसंचलनात पथक प्रमुख पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे व जवानांचे कौतुक करत भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com