रेकॉर्डवरच्या शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Gadchiroli Maoist News : जंगलात उरलेल्या माओवाद्यांनी बंदुकीचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्विकारावा, असे आवाहन गडचिरोलीतील डाव्या पक्षांची केले आहे.
Gadchiroli Maoist News

Gadchiroli Maoist News

esakal

Updated on: 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील शेवटचा माओवादी जयराम उर्फ नंदू मोंगे गावळे याच्या गिलनगुडा येथील घरी डाव्या पक्षाच्या नेत्यांनी भेट त्याला हिंसेचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. भारत हा लोकशाहीवादी देश असून संविधानिक पद्धतीने चालत आलेला आहे. येथे बंदुकीच्या जोरावर सामान्य माणसाला न्याय मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे जंगलात उरलेल्या माओवाद्यांनी बंदुकीचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्विकारावा, असे आवाहन गडचिरोलीतील डाव्या पक्षांची केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com