

Success Story
sakal
गडचिरोली : माओवादग्रस्त, अतिमागास अशीच ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गुणवंतांची मात्र अजिबात कमतरता नाही. जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर या छोट्याशा खेड्यातील रोहित रवींद्र पाल याने हेच सिद्ध केले आहे. त्याने एमपीएससी वनसेवा परीक्षेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक मिळवत सहायक वनसंरक्षक (वर्ग-१) पद पटकावले.