Gadchiroli News : फरार नक्षल दाम्पत्याला हैदराबाद येथून अटक

गडचिरोली पोलिस दलाने २००६-०७ पासून फरार असलेल्या जहाल नक्षलवादी दाम्पत्याला एक वर्षापासून पाळत ठेवत...
Crime
Crimeesakal

गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाने २००६-०७ पासून फरार असलेल्या जहाल नक्षलवादी दाम्पत्याला एक वर्षापासून पाळत ठेवत हैदराबाद येथून सोमवार (ता. २०) सकाळी अटक केली आहे.

टुगे उर्फ मधुकर चिनन्ना कोडापे (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवादी पतीचे नाव असून श्यामला उर्फ जामनी मंगलू पुनम (वय ३५) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार अटक करण्यात आलेला टुगे उर्फ मधुकर चिनन्ना कोडापे हा गडचिरोली येथील रहिवासी असून तो अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला होता.

Crime
Hingoli News : अप्पर जिल्हाधिकारी प्रकरणातील आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी

२००२ पासून सिरोंचा दलममध्ये कार्यरत होता. तसेच २००६ पर्यंत अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा दलममध्ये कमांडर पदावर कार्यरत राहून दलम सोडून फरार झाला होता. त्याच्यावर ९ खून, ८ चकमक, २ दरोडा, ४ जाळपोळ, १ खुनाचा प्रयत्न व १ इतर असे एकूण २५ गुन्हे दाखल आहेत.

तसेच महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर एकूण ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.तसेच अटक करण्यात आलेली शामला उर्फ जामनी मंगलू पुनम ही बंडागुडा, बासागुडा, जि. बिजापूर (छत्तीसगड) येथील रहिवासी असून ती अहेरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.

तिच्यावर आतापर्यंत १ खून, ५ चकमकी, १ जाळपोळ, १ दरोडा व १ इतर असे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र सरकारने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. शामला ही टुगे उर्फ मधुकर कोडापेची पत्नी असून दोघेही २००६ मध्ये फरार झाले होते.

Crime
UPI-PayNow : भारत-सिंगापूर क्रॉस बॉर्डर कनेक्टिव्हिटीचा नेमका फायदा कोणाला?

तसेच तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यात सतत विविध ठिकाणे बदलून पोलिस दलास गुंगारा देत होते. हैदराबाद येथे टुगे कोडापे हा तेथील सुरक्षा कंपनीत वॉचमन या पदावर काम करत होता व त्याची पत्नी शामला उर्फ जामनी ही एका कारच्या शोरूममध्ये हाऊसकिपींगमध्ये काम करत होती.

हे दोघेही नक्षलवादी पती-पत्नी हैदराबाद येथे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाताच गडचिरोली पोलिसांनी त्यांच्यावर सतत एक वर्ष पाळत ठेवून सोमवारी दोघांनाही अटक केली.

आतापर्यंत ६४ अटकेत..

गडचिरोली पोलिस दलाने प्रभावी कामगिरी करत जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ६४ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com