
गडचिरोली : सर्वांचे लाडके श्री गणेश भक्ता घरी येण्यासाठी पिता श्री शंकर व माता पार्वतीचा निरोप घेऊन कैलास पर्वतावरून उतरत असताना गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली पोलिसांनी मुसळधार पाऊस, पूरपरीस्थितीला तोंड देत, निबिड अरण्यातील तब्बल दहा डोंगर पार करून जंगलातून जवळपास ५० किमीचा कठीण मार्ग तुडवत चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घातले. कोपर्शीच्या जंगलातील या थरारक चकमकीत मारलेल्या चारही माओवाद्यांची ओळख पटल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गुरुवार (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली.