Gallantry Awards: गडचिरोली पोलिस दलातील सात जणांना राष्ट्रपती पदक
Gadchiroli Police: गडचिरोली पोलिस दलातील सात अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस शौर्य पदक जाहीर करण्यात आले. हुतात्मा पोलिस शिपाई सुरेश तेलामी यांच्यासह हे सर्व वीर जवान त्यांच्या धैर्यपूर्ण कार्यासाठी सन्मानित झाले आहेत.
गडचिरोली : देशभरामध्ये पोलिस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जात असते.