

Official announcement of Gadchiroli District Premier League GDPL 2026
Sakal
गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे आयोजित गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग (GDPL) च्या २०२६ टी–२० सीझनचे नियम, स्वरूप आणि कार्यक्रम शुक्रवार (ता. २१) अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. आगामी सीझनची सुरुवात १६ जानेवारी २०२६ रोजी सुरू होणाऱ्या पात्रता फेऱ्यांपासून होणार आहे. जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हेतू संस्थेने व्यक्त केला आहे. या स्पर्धेत एकूण २0 संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये १२ तालुका संघ आणि ८ विभागीय संघ आहे.