esakal | गडचिरोली : पर्लकोटा नदीला सहाव्यांदा पूर
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

गडचिरोली : पर्लकोटा नदीला सहाव्यांदा पूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अनेक मार्गांची वाहतूक बंद आहे. यात भामरागडजवळील पर्लकोटाला नदीला पूर आल्याने भामरागड- आलापल्ली मार्गाची वाहतूक महिनाभरात सहावेळा बंद झाली असून पुराचे पाणी वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्याच्या अनेक भागांत आज पहाटेपासून पावसाला सुरवात झाली. भामरागड तालुक्‍यासह काही तालुक्‍यात दिवसभर संततधार सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आला. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड- आलापल्ली मार्गाची वाहतूक आज दुपारपासून बंद झाली. भामरागड ते आलापल्ली या मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी ठेंगणे पूल असल्याने नाले तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी वाहतूक ठप्प झाली.
भामरागडपासून सहा किलोमीटर दूर असलेल्या कुमरगुडा नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने एका रुग्णवाहिकेसह अनेक पर्यटक या ठिकाणी अडकून पडले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्यांना पूर आल्याने मधे अडकलेल्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. गडचिरोलीलगतची कठाणी तसेच वैनगंगा नदीही आज सकाळपासून दुथडी भरून वाहत होती. सततच्या पावसामुळे कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, सिरोंचा, अहेरी व भामरागड तालुक्‍यातील 200 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे.

loading image
go to top