

Gadchiroli
esakal
गडचिरोली: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसह त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने १२० विद्यार्थ्यांची दिल्ली येथे विमानाद्वारे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. २९ मे ते १ जून २०२६ या कालावधीत आयोजित या सहलीसाठी विद्यार्थ्यांनी शुक्रवार (ता. २९) नागपूर विमानतळावरून दिल्लीकडे प्रस्थान केले.