Gadchiroli : वैरागड येथे कापड दुकानातून चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gadchiroli crime news

Gadchiroli : वैरागड येथे कापड दुकानातून चोरी

वैरागड (जि. गडचिराेली) : वैरागड येथे शनिवारी (ता. १५) रात्री अज्ञात चोरट्यांनी कापड दुकानातून दोन लाख ५५ हजाराची चोरी करून पसार झाले. तसेच इतरही दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला.वैरागड येथे संजय नंदनवार यांचे कापड दुकान असून रोज लाखो रुपयांचा व्यवहार होत असताे. हे कदाचित चोरट्यांना माहित असावे. ही बाब हेरून रात्रौ दोन ते अडीच वाजताच्या सुमारास चारच्या संख्येने आलेल्या चोरांनी दुकानाचे शटर वाकवून चोरी केली.

हेही वाचा: Gadchiroli : लाच स्वीकारताना तलाठ्याला अटक

यात ७५ हजार रोख रक्कम व १ लाख ८० हजार रुपयांचे रेडीमेड कपडे नेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सुभाष हर्षे व दत्तू हर्षे यांचे सोने-चांदीचे दुकानही फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश न आल्याने ते परत गेले. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोर दिसून येत आहेत. परंतु तोंडाला रुमाल बांधून असल्याने चोराची ओळख पटली नाही.

हेही वाचा: Gadchiroli : जप्त करण्यात आलेले स्फोटकांनी भरलेले कुकर

यापूर्वीसुद्धा वैरागड येथे अनेक चोर्‍या झाल्या. परंतु चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. म्हणूनच चोरांची हिंमत वाढली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वाी पोलिस उपनिरीक्षक झिंझुरडे, बीट जमादार रवींद्र चौके, पोलिस पाटील गोरख भानारकर करीत आहेत.