स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Gadchiroli ST Bus Service Starts in Tumarkothi After Independence : भामरागडपासून सुमारे ३० कि.मी. आणि अहेरीपासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेल्या तुमरकोठी येथील नागरिकांना तहसील व जिल्हा मुख्यालयापर्यंत सहज प्रवास करता यावा, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली.
Gadchiroli ST Bus Service Starts in Tumarkothi After Independence

Gadchiroli ST Bus Service Starts in Tumarkothi After Independence

esakal

Updated on

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर प्रथमच गडचिरोली पोलिस दलाच्या प्रयत्नांतून आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने मंगळवार (ता. १७) रोजी तुमरकोठी ते अहेरी या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. भामरागडपासून सुमारे ३० कि.मी. आणि अहेरीपासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेल्या तुमरकोठी येथील नागरिकांना तहसील व जिल्हा मुख्यालयापर्यंत सहज प्रवास करता यावा, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली. गावात प्रथमच बस पोहोचल्याने नागरिकांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात, नृत्य करत उत्साहात बसचे स्वागत केले. शाळेतील लहान मुलांनी तिरंगा हातात घेऊन बसचे स्वागत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com