गडचिरोली - आपण गावाची कल्पना करतो तेव्हा नजरेसमोर काय येते? २० किंवा २५ घरे, ग्रामपंचायत, अंगणवाडी, मध्यवर्ती ठिकाणी एखादे देऊळ, रस्त्यावर ये-जा करणारी गुरू-ढोर असे काहीसे चित्र आपल्या मनात असते..पण गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात इरपुंडी नावाचे एक गाव आहे. या गावात फक्त एकच घर असून एकच कुटुंब राहते. या कुटुंबातील सदस्य ही या गावची लोकसंख्या आहे. घनदाट जंगलातील या इरपुंडीमध्ये झाडे कुटुंबांचे एकमेव घर असून सध्या कुटुंबात ७ सदस्य आहेत.विशेष म्हणजे २०११ ला झालेल्या शासकीय जनगणनेत इरपुंडीची स्वतंत्र नोंद आहे. इरपुंडीत पाच पुरुष आणि एक महिला असे मिळून ६ लोकं असल्याची नोंद आहे. गडचिरोलीतील सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी एज्युकेशन (सर्च) या संस्थेने धानोरा तालुक्यातील २३० गावांत २०२४-२०२५ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये इरपुंडीतील लोकसंख्या ९ असल्याचे नोंदवले आहे..ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग संस्थापक असलेल्या ‘सर्च’ संस्थेचे संख्याशास्त्र विभाग संशोधन कार्यासाठी धानोरा तालुक्यात जनगणना करत असते. हे गाव गडचिरोली शहरापासून ४२ किलोमीटर अंतरावर आहे. तर इरपुंडीपासून सर्वांत जवळचे मोठे गाव तुकुम हे पाच किलोमीटर अंतरावर आहे.तुकुमपासून डांबरी रस्ता जातो. जंगलातून जाणाऱ्या या रस्त्यावर जवळपास अर्धा किलोमीटर इतका कच्चा रस्ता आहे. तेथून पुढे झाडे यांच्या घरी जाण्यासाठी काँक्रिटचा रस्ता करण्यात आला आहे..यशोदा झाडे (वय ६०) या कुटुंब प्रमुख आहेतत्यांच्यासोबत ३ मुले, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. तर एक मुलगा आणि त्याची पत्नी अन्यत्र राहात आहेत. पतीच्या निधनानंतर कष्टाने संसार चालवल्याचे यशोदा झाडे सांगतात. त्यांचे नातेवाईक तुकूम गावात राहातात, त्यांचे सहकार्य असते, असेही त्यांनी सांगितले..शेती, प्राणी हीच संपत्तीझाडे यांची शेती असून धानाची शेती, गुरे, शेळ्या, काही कोंबड्या ही त्यांची संपत्ती आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठी त्यांना तुकुम गावावर अवलंबून राहावे लागते. आशा सेविका अंजना उसेंडी आणि सर्चचे आरोग्य सुपरवायजर अनिल परसे इरपुंडीला अधून-मधून भेट देत असतात. यशोदा झाडे नियमित शेतातील कामे करतात..त्या म्हणाल्या की, आम्ही अनेक पिढ्या या इरपुंडीत राहातो. आमचे एकच कुटुंब असले तरी आम्हाला कधीही भीती वाटलेली नाही. लोकं आता हत्ती आणि वाघांची भीती असल्याचे बोलतात, पण आमचा कधीही त्यांच्याशी सामना झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.तुकूम ग्रामपंचायतीअंतर्गत इरपुंडी गावात एकच घर आहे. तिथे रस्ता, नाली, इलेक्ट्रिक पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे व ग्रामपंचायत सदस्यसुद्धा तिथलाच आहे.- दत्तात्रेय वायबसे, ग्रामविकास अधिकारी, तुकूम, ता. धानोरा, जि. गडचिरोली.कमी लोकसंख्या असलेली गावे, पाडे किंवा टोले हे गडचिरोली जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे. शंभरपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांची संख्या धानोरा तालुक्यात ३५ इतकी आहे. लोकसंख्या कमी असलेल्या गावांत आरोग्यसेवा आणि इतरही शासकीय सेवासुविधा पोहचणे आव्हानात्मक काम असते. यातील बरीच गावे घनदाट जंगलात आहेत. दिवसा हे लोक घरी नसतात, त्यामुळे त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचण्यात अडचणी येतात.- महेश देशमुख, सहसंचालक आणि संख्याशास्त्र विभाग प्रमुख, सर्च, जि. गडचिरोली.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.