युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल'
नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संशोधनवृत्तीची स्तुती केली. गडकरी देशाला नवी दृष्टी देत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल'
नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संशोधनवृत्तीची स्तुती केली. गडकरी देशाला नवी दृष्टी देत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
रेशीमबाग मैदानावर शेतकऱ्यांचे राष्ट्रीय प्रदर्शन "ऍग्रोव्हिजन'च्या उद्‌घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्‌घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह उपस्थित होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, बिहारचे कृषिमंत्री प्रेमकुमार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे, महापौर नंदा जिचकार, जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे व शहरातील सर्व आमदार उपस्थित होते. ते म्हणाले, मागील सरकारच्या नाकर्तेपणामुळे उत्तर प्रदेशातील दीडशे वर्षांची उसाची शेती नष्ट झाली होती. खासदार असताना केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी यावर चर्चा केली. त्यांनी उसाच्या शेतीत मोठी संधी असल्याचे सांगितले. त्यांच्याच सल्ल्याने उत्तर प्रदेशात सत्तेत येताच बंद पडलेले 121 साखर कारखाने सुरू करण्यात आले. आतापर्यंत शेतकऱ्यांना उसाची 40 हजार कोटींची रक्कम देण्यात आली. आता या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीतून इथेनॉल निर्मितीवर भर देणार आहे. त्यामुळे इंधन आयात करण्यावर खर्च होणारा निधी वाचेल. या निधीतून शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणता येईल. पुढील वर्षीपासून बायोफ्यूएल तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. देशाला समृद्ध करण्यासाठी शेतकरी समाधानी व आनंदी असणे आवश्‍यक आहे, असे गडकरी नेहमी सांगतात. त्यांची व मुख्यमंत्री फडणवीस यांची दृष्टी व्यापक आहे. भाजपच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने गेल्या चार वर्षांत समाजातील प्रत्येक घटकांसाठी केलेली कामे अतुलनीय आहेत. गावांमध्येच शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करीत आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या दृष्टीमुळे रस्ते, जलमार्गात क्रांती होत आहे. शिवाय ऍग्रोव्हिजनच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारीही ते यशस्वीपणे पार पाडत आहेत. ऍग्रोव्हिजनमुळे शेतकऱ्यांत जागृती होईलच. शिवाय महिला, तरुणांना रोजगाराचेही माध्यम ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
काव्यातून गडकरींचे कौतुक
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यामुळेच काशीत पहिले वॉटर वे व मल्टिमॉडल टर्मिनल केवळ तीन वर्षांत तयार झाले. गडकरींची स्तुती करताना नमूद करीत योगी यांनी "वसुधा का नेता कौन हुआ, वो खंड विजेता कौन हुआ, नवधर्म प्रणेता कौन हुआ, अतुलनीय यशकर्ता कौन हुआ, जिसने न कभी आराम किया, विघ्नों में रहकर काम किया' या ओळी ऐकविल्या अन्‌ टाळ्यांचा गडगडाट झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadkari model of UP development