भिसी ग्रामपंचायतच्या मासिक सभेत गाजला लाचेचा मुद्दा...सरपंच, उपसरपंचावर आगपाखड

दीपक अडकिने
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

लाच देणे अथवा घेणे हे कायद्याने गुन्हा आहे; तरीही अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी कोणत्या ना कोणत्या कारणाने लाच घेत असल्याचे प्रकरण समोर येत आहे. आता तर ग्रामपंचायतलासुद्धा लाच घेतल्याचे गालबोट लागले आहे. यातूनच ग्रामपंचायत मासिक सभेत लाचेत सरपंच, उपसरपंच अडकल्याचे पडसाद शुक्रवारी उमटले.

भिसी (जि. चंद्रपूर) : ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच काही दिवसांपूर्वीच लाचेत अडकले होते. त्याचे पडसाद शुक्रवारी (ता. ३१) झालेल्या मासिक सभेत उमटले. लाचेबाबत काही सदस्यांनी सभेत विचारणा केली. त्यामुळे सरपंच आणि सदस्यांत चांगलीच जुंपली. शेवटी परिस्थिती बिघडत चालली असल्याचे बघून सरपंचाने पोलिसांना पाचारण केले. या घटनेचा काही सदस्यांनी निषेधही केला आहे. एखाद्याला कामानिमित्त लाच मागून त्याचे काम करण्याचा विडा पदा

सरपंच, उपसरपंचाविषयी रोष

भिसीच्या सरपंच योगिता गोहणे आणि उपसरपंच लीलाधर बन्सोड यांना 22 जुलै रोजी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या घटनेने सरपंच, उपसरपंचाविषयी गावकरी, सदस्यांत रोष निर्माण झाला होता. त्यात ग्रामसचिवाने शुक्रवारी (ता.३१) अचानक सभेचे आयोजन केले. या सभेला सतरापैकी पंधरा ग्रामपंचायत सदस्य हजर होते.

लाचेचा मुद्दा गाजला

प्रारंभी चार महिन्यांपासून सभा का बोलविली नाही, यावर काही सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केला. हा मुद्दाही सभेत चांगलाच गाजला. त्यानंतर 22 जुलै रोजी सरपंच आणि उपसरपंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले, अशी विचारणा सदस्यांनी केली.

जाणून घ्या : अरे... हे काय राष्ट्रीय महामार्गात एक किमी रस्ताच नाही, वाचा सविस्तर...

सदस्यांनी केला घटनेचा निषेध

याच मुद्द्यावरून सरपंच, सदस्यांत चांगलीच जुंपली. त्यामुळे परिस्थिती चिघळत असल्याचे दिसताच सरपंचाने पोलिसांना पाचारण केले. लोकशाहीत आम्हाला कोणतेही प्रश्‍न उपस्थित करू देत नाही. ते विचारणा केले असताना पोलिसांना बोलावून दाबून टाकले जातात, असे म्हणून राजू गभणे, देवेंद्र मुंगले, राजू सातपैसे, पंकज रेवतकर, मीरा काळे, अविनाश रोकडे, भावना वाघ, विजय नन्नावरे या सदस्यांनी सभात्याग करून घटनेचा निषेध नोंदविला.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gajla bribery issue in monthly meeting of Bhisi Gram Panchayat