esakal | काय आश्चर्य! पोळ्यानिमित्त खेळला जातो इथे चक्क जुगार आणि महिलांचाही असतो सहभाग
sakal

बोलून बातमी शोधा

jugar

पूर्वी द्यूत किंवा चौसर हा खेळ खेळला जायचा. अद्याप काही ठिकाणी हा खेळ प्रचलित आहे. याप्रमाणेच झेंडी-मुंडी खेळली जाते. पण, द्यूत किंवा चौसर खेळात एक अथवा दोन फासे असतात. तर झेंडी-मुंडी खेळात तब्बल सहा चौकोनी फासे असतात. याचा पटही निराळा असतो.

काय आश्चर्य! पोळ्यानिमित्त खेळला जातो इथे चक्क जुगार आणि महिलांचाही असतो सहभाग

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : जुगाराचे व्यसन वाईटच पण, तरी त्यालाही प्राचीन इतिहास आणि परंपरा आहे. गंमत म्हणजे काही ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुगार खेळणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे पोळ्यानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात "झेंडी-मुंडी' हा अनोखा जुगार खेळला जातो. यंदाही अनेक ठिकाणी आबालवृद्धांनी या पारंपरिक खेळाचा आनंद घेतला.

पूर्वी द्यूत किंवा चौसर हा खेळ खेळला जायचा. अद्याप काही ठिकाणी हा खेळ प्रचलित आहे. याप्रमाणेच झेंडी-मुंडी खेळली जाते. पण, द्यूत किंवा चौसर खेळात एक अथवा दोन फासे असतात. तर झेंडी-मुंडी खेळात तब्बल सहा चौकोनी फासे असतात. याचा पटही निराळा असतो.

या पटावर सहा आकृत्या किंवा चित्रे असतात. यात जुगाराच्या पत्त्यांतील इस्पिक, चिडी, वीट किंवा चौकट, बदाम या चित्रांसोबत फूल आणि झेंड्याची चित्रे असतात. मग, हा खेळ खेळताना आपल्याला हव्या असलेल्या चिन्हावर पैसे ठेवले जातात. हे पैसे एक रुपयापासून ते अगदी हजार रुपयांपर्यंतही असतात. त्यानंतर सहा फासे एका डब्यात घालून त्याला खुळखुळ हलवून फेकतात. समजा तुम्ही बदाम चिन्हावर दहा रुपयांची नोट ठेवली आणि फासे फेकल्यावर त्यातील तीन फाश्‍यांवर बदाम चिन्ह आले, तर तुम्हाला तिप्पट म्हणजे तीस रुपये मिळतील.

अगदी सहा फाश्‍यांवर तेच चिन्ह आले, तर सहा पट परतावा मिळतो. पण, सहा पैकी केवळ एकाच फाश्‍यावर तुम्ही निवडलेले बदाम चिन्ह आले, तर गेले तुमचे दहा रुपये.

हा खेळ बैलपोळ्याच्या आदल्या दिवसापासून सुरू होतो आणि तान्हा पोळासंपेपर्यंत म्हणजे साधारणत: तीन दिवस खेळला जातो. काही ठिकाणी फक्त तान्हा पोळ्याच्या दिवशी हा खेळ खेळतात. त्यानंतर वर्षभर कुणी या खेळाचे नावही घेताना दिसत नाहीत. एकूणच यात जुगारापेक्षा सणानिमित्त घेतल्या जाणाऱ्या आनंदाचा भाग अधिक असतो. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण या खेळात रमलेले दिसून येतात. यंदाही कोरोनाची भीती बाजूला सारत हा खेळ खेळला गेला.

जाणून घ्या - केसात कोंडा होतोय? आता घाबरू नका.. तुमच्या रोजच्या वापरातील या वस्तू ठरतील रामबाण उपाय...नक्की वाचा

महिलांचाही सहभाग
या खेळात महिलासुद्धा सहभागी होतात. काही ठिकाणी महिला व मुलींसाठी झेंडी-मुंडीसारखाच पण वेगळा खेळ ठेवण्यात येतो. यात पैशांच्या मोबदल्यात परतावा म्हणून साबण ठेवायचा बॉक्‍स, साबण वडी, पेन असे उपयोगी साहित्य असते. हा खेळ साधारणत: पत्त्यातील तीन पत्तीसारखा असतो. तिथेही महिलांची गर्दी असते.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top