esakal | केसात कोंडा होतोय? आता घाबरू नका.. तुमच्या रोजच्या वापरातील या वस्तू ठरतील रामबाण उपाय...नक्की वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

here are the remedies for dandruff in hairs read full story

आपल्यापैकी बहुतांश जण केसात कोंडा झाल्यावर निरनिराळ्या प्रकारचे शॅम्पू वापरतात. या शॅम्पूमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात ज्यामुळे आपले केस अजून खराब होतात.

केसात कोंडा होतोय? आता घाबरू नका.. तुमच्या रोजच्या वापरातील या वस्तू ठरतील रामबाण उपाय...नक्की वाचा

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर: आपले केस नेहमीच सौंदर्य वाढवण्यासाठी आपली मदत करत असतात. ज्यांचे केस लांब ते लोकं अधिक सुंदर दिसतात. पुरुषांमध्ये ज्यांची हेअर कट चांगली ते सगळ्यांमध्ये उठून दिसतात. मात्र आपले केस चांगले ठेवण्यासाठी नेहमीच आपल्याला कसरत करावी लागते. केसात उवा होणे, कोंडा होणे किंवा केस गळणे या समस्या आपल्याला नेहमीच येत असतात. मात्र आता चिंता करू नका तुमच्या केसात निर्माण होणाऱ्या या समस्यांवर रामबाण उपाय आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगणार आहोत. 

आपल्यापैकी बहुतांश जण केसात कोंडा झाल्यावर निरनिराळ्या प्रकारचे शॅम्पू वापरतात. या शॅम्पूमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात ज्यामुळे आपले केस अजून खराब होतात. काही जणांचे केस अधिक प्रमाणात गळायला सुरुवात होते. मात्र कोंडा घालवण्याचे रामबाण उपाय तुमच्या घरातच आहेत. 

'पुलिस को टीप किसने दिया' यावरून दारू विक्रेत्यांमध्ये प्रचंड राडा.. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार

कोंडा घालवण्यासाठी या वस्तूंचा करा उपयोग

बेकिंग सोडा  

बेकिंग सोडा हा आपल्या केसातील कोंडा घालवण्यासाठी रामबाण उपाय आहे. पाण्यात ३-४ चमचे बेकिंग सोडा घ्या. शॅम्पू झाल्यानंतर हे मिश्रण आपल्या डोक्याच्या स्काल्पला लावा आणि १० मिनिटांसाठी राहू द्या. त्यानंतर केस धुवून टाका. यामुळे केसातील संपूर्ण कोंडा निघून जाईल. 

भोपळ्याचा रस 

दुधी भोपळ्याचा रस करून तो आपल्या केसांना नियमित लावा ज्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होईल. 

लसूण आणि नारळाचे तेल

४ चमचे लसूण तेल, २ चमचे नारळाचे तेल आणि १ चमचा मेहंदीचे तेल यांचे मिश्रण करून ते आपल्या केसांना लावा. एक तासभर हे मिश्रण राहू द्या. त्यानंतर केस धुवून टाका. 

मध 

लसूण तेल आणि  मध यांचे मिश्रण केसांना आणि स्काल्पला लावा. यामुळे केसात साचलेली घाण दुर्गंधी दूर होते. तसेच खाजही सुटत नाही.    

सावधान! विदर्भातील पावसाबाबत हवामान विभागाने दिले हे गंभीर संकेत.. वाचा सविस्तर  

कढीपत्ता 

कढीपत्त्यात अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल गुण असतात. तसलेच त्यामध्ये प्रोटीनची मात्र असते ज्यामुळे आपल्या केसांना फायदा होतो.  हा केसांसाठी सगळ्यात मोठा रामबाण उपाय आहे. 

कढीपत्याची ७-८ पाने खोबरेल तेलात टाका आणि हे तेल कामात होऊ द्या. यानंतर ते आपल्या स्काल्पला लावा यामुळे केस गळती कमी होते. 

कढीपत्य्याची काही पाने भाजून घ्या. ही पाने तुम्ही वापरत असलेल्या तेलात टाका आणि रात्री डोक्याला हे तेल लावून झोपा. सकाळी केस गरम किंवा कोमट पाण्याने धुवा. यामुळे केस मजबूत राहण्यास मदत होते.      
 

loading image
go to top