esakal | अकोला : झाडालाच बनविले गणपती (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : झाडालाच बनविले गणपती (व्हिडिओ)

पर्यावरणपूरक हा गणपती शाडू माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा नसून, चक्क उभ्या झाडाचा आहे. ही संकल्पना सुचलीय अकोल्याच्या जठरपेठ भागातील रिंकू परदेशी यांना.

अकोला : झाडालाच बनविले गणपती (व्हिडिओ)

sakal_logo
By
जयेश गावंडे

अकोला : सध्या राज्यभरात गणेश उत्सवाची धूम आहे. अनेक ठिकाणी विविध देखावे पाहायला मिळत आहेत. देखाव्यामध्ये विविध संदेशही पाहायला मिळतात. मात्र, अकोल्यात आगळावेगळा गणपती सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

पर्यावरणपूरक हा गणपती शाडू माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा नसून, चक्क उभ्या झाडाचा आहे. ही संकल्पना सुचलीय अकोल्याच्या जठरपेठ भागातील रिंकू परदेशी यांना.

सध्या विदर्भात आणि मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. अशातच गणेश मूर्तींचे विसर्जन पाणी दूषित करते. म्हणून गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित न करता, वृक्ष संवर्धन करत. वृक्षालाच गणेश समजून पाणी घालावे म्हणजे खऱ्या अर्थाने गणेश पूजन होईल, असा संदेश परदेशी यांनी दिलाय.

loading image
go to top