गांधीसागर तलाव ठरला "सुसाईड पॉइंट' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नागपूर - शहरातील गांधीसागर तलाव "सुसाईड पॉइंट' ठरला आहे. पाच वर्षांत 209 जणांनी गांधीसागर तलावात आत्महत्या केली, तर दुसऱ्या क्रमांकावर अंबाझरी तलाव आहे. अंबाझरी तलावात आतापर्यंत 74 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिस विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

नागपूर - शहरातील गांधीसागर तलाव "सुसाईड पॉइंट' ठरला आहे. पाच वर्षांत 209 जणांनी गांधीसागर तलावात आत्महत्या केली, तर दुसऱ्या क्रमांकावर अंबाझरी तलाव आहे. अंबाझरी तलावात आतापर्यंत 74 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिस विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

पोलिस दप्तरी आत्महत्या करणाऱ्यांची नोंदी असतात. त्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या तलावात उडी घेऊन केल्याचे उघड झाले आहे. शहरात फुटाळा तलाव, अंबाझरी, गांधीसागर, गोरेवाडा, कोराडी, पोलिस, नाईक, सोनेगाव व सक्‍करदरा असे नऊ तलाव आहेत. 2013 ते एप्रिल 2018 पर्यंत तलावात उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी पोलिस विभागाने सादर केली आहे. आत्महत्या करणाऱ्यांचा सूक्ष्म अभ्यास पोलिसांनी केला असून, त्यासाठी वेळेनुसार सहा भागात वर्गीकरण केले आहे. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या दुपारी 12 ते 4 वाजतादरम्यान केल्याची नोंद आहे. 

वर्ष 2013 ते एप्रिल 2018 

तलाव आत्महत्या 
अंबाझरी 74 
फुटाळा 43 
गांधीसागर 209 
अन्य तलाव 51 

8 ते 4 वाजेदरम्यान सर्वाधिक आत्महत्या 
आत्महत्या करण्याच्या वेळेचे पोलिसांनी निरीक्षण केले असता सर्वाधिक आत्महत्या सकाळी आठ ते दुपारी चार वाजताच्या झाल्या आहेत. 164 जणांचे मृतदेह सकाळी आठ ते दुपारी चार वाजताच्या सुमारास तलावातून काढले. रात्री दहा ते पहाटे पाच या दरम्यान 110 जणांनी तलावात जीवनयात्रा संपविल्याची माहिती समोर आली आहे. 

नैराश्‍यातून एकलकोंडेपणा निर्माण होतो. त्यामुळे तो एकांत शोधतो. आत्महत्या करताना कोणतीही वेदना होऊ नये, त्यासाठी तलाव हा पर्याय शोधतो. मनात दाटलेली उर्मी वाढत जाऊन आत्महत्येस प्रवृत्त होतो. सर्वांत सोपा उपाय म्हणून तो पाण्यात उडी घेण्याचा निर्णय घेतो. 
- प्रा. राजा आकाश,  मानसोपचारतज्ज्ञ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gandhisagar lake becomes Suicide Point