esakal | गणेशोत्सव2019 : लोकमान्य टिळकांच्या पूर्वीही इथं व्हायचा गणेशोत्सव..! (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव2019 : लोकमान्य टिळकांच्या पूर्वीही इथं व्हायचा गणेशोत्सव..! (व्हिडिओ)

जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येणाया नेर पिंगळाई या गावात गंगाधर स्वामी मठात तीनशे वर्षापूर्वीपासून श्री गणेश स्थापनेची परंपरा कायम आहे. गुरु आणि शिष्याचा गणपती म्हणुन हा गणपती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.

गणेशोत्सव2019 : लोकमान्य टिळकांच्या पूर्वीही इथं व्हायचा गणेशोत्सव..! (व्हिडिओ)

sakal_logo
By
अरुण जोशी

गणेशोत्सव2019
अमरावती-
जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येणाया नेर पिंगळाई या गावात गंगाधर स्वामी मठात तीनशे वर्षापूर्वीपासून श्री गणेश स्थापनेची परंपरा कायम आहे. गुरु आणि शिष्याचा गणपती म्हणुन हा गणपती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.

या गणपतीचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे या गावातील इतर सार्वजनिक आणि घरगुती गणेशाची स्थापना गुरुशिष्याच्या गणपती नंतरच होते. अमरावती जवळून 45 कि.मी. अंतरावर असलेले नेर पिंगळाई हे गाव या गावात इ. स. 963साली स्थापन झालेल्या गुरु गंगाधर स्वामी मठ आजही अस्तित्वात आहे. गणपती मठ म्हणूनच या गावची सर्वदुर ओळख आहे.

मठाचे संपूर्ण बांधकाम हे दगडी असून मठाच्या मधोमध श्री गणेशाची स्थापना केली जाते. गुरु गंगाधर स्वामी नंतर आता पर्यंत 23 मठाधीपतीनी मठाचा कारभार पाहीला आहे. याच मठामध्ये गंगाधर स्वामी यांची शिष्य शरणाई मातेचा मुलगा हरविला होता तेव्हा तिने मुलगा सापडल्यास मठामध्ये  श्री गणेशाची  स्थापना करेल म्हणुन नवस केला व श्री गणेश चतुर्थीला तिचा मुलगा सापडला.गुरु गंगाधर स्वामी यांनी शरणाई मातेला केलेल्या उपदेशानंतर याच मठात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आज त्याला 1840 वर्षे झालीत तेव्हा पासून हा गुरु आणि शिष्याचा गणपती म्हणून संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान, मठात बाप्पाचं दर्शन घेण्याकरीता हजारो भाविक दर्शन घेण्याकरीता नेर पिंगळाई या गावात येतात. जे भाविक श्रद्धेने बाप्पाला नवस करतात त्या भाविकांना लगेचच त्याचा नवस पूर्ण झाल्य्याची प्रचिती येते. त्यामुळे नवसाला पावणारा गणपती म्हणुन या गणेशाची ख्याती आहे.

loading image
go to top