महिलेसह चौघांच्या टोळीने केली अनेक ठिकाणी घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज जप्त, टोळीला अटक

संतोष ताकपिरे
Saturday, 5 December 2020

सीमा हिला यापूर्वीही अनेकदा अटक झाली. सीमा व तिच्या साथीदारांनी वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर व कारंजा लाड येथील दिवसाच्या दोन घरफोड्यांचीसुद्धा कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमरावती/वरुड : स्थानिक गुन्हेशाखेने शनिवारी (ता. ५) वरुड येथील घरफोडीत एका महिलेसह चौघांना अटक केली. शेख नसीम शेख सलीम (वय 33, दोघेही रा. सादियानगर, अमरावती), सीमा, शेख तौसिफ शेख लतीफ (वय 19, रा. अन्सारनगर) व विवेक यादव कुंबलकर (रा. संतोषीनगर, अमरावती) अशी अटक झालेल्या चौघांची नावे आहेत.

 

26 ऑक्‍टोबर ते 17 नोव्हेंबर 2020 या कालावधीत वरुड ठाण्याच्या हद्दीत दिवसाच दोन घरफोड्या झाल्या. त्यामध्ये पोलिसांनी रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने जप्त केले. नमूद चौघांकडून 99 हजारांचे सोन्याचे दागिने, 36 हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली 90 हजार रुपयांची कार, 1 दुचाकी असा एकूण 2 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. सीमा व तिच्या साथीदारांनी वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर व कारंजा लाड येथील दिवसाच्या दोन घरफोड्यांचीसुद्धा कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

जाणून घ्या : महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, यशोमती ठाकूर यांचे सूचक ट्विट

पोलिस रेकॉर्डवर अनेक गुन्हे

सीमा हिला यापूर्वीही अनेकदा अटक झाली. अमरावती ग्रामीणमध्ये तिच्यावर 24 चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असून, आयुक्तालयातही पोलिसांच्या रेकॉर्डवर तिचे नाव असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : महाराष्ट्र दिनापासून नागपूर-शिर्डी वाहतूक; बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

सुवर्णकार पहिल्यांदाच गजाआड

सीमा, शेख नसीम व शेख तौसिफ या तिघांनी केलेल्या घरफोडीमधील ऐवज संतोषीनगर, अमरावती येथील सुवर्णकार विवेक कुंबलकर याला विकत होते. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सुवर्णकाराला पहिल्यांदाच अटक केली.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A gang of four including a woman was arrested