नक्षल्यांना स्फोटके पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जण पोलिसांच्या ताब्यात

नक्षलविरोधी अभियानाच्या दरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांसाठी स्फोटकांसाठीचे सामुग्री व साहित्य नेणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले.
Crime
CrimeSakal
Summary

नक्षलविरोधी अभियानाच्या दरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांसाठी स्फोटकांसाठीचे सामुग्री व साहित्य नेणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले.

गडचिरोली - नक्षलविरोधी (Naxals) अभियानाच्या (Campaign) दरम्यान पोलिसांनी (Police) नक्षलवाद्यांसाठी स्फोटकांसाठीचे सामुग्री व साहित्य नेणाऱ्या एका टोळीला जेरबंद (Gang Arrested) केले. ही टोळी हे साहित्य तेलंगणामधून छत्तीसगडला नेत होते. मार्गात दामरंचा येथे पोलिसांनी त्यांना पकडले.

शनिवारी (ता. १९) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस व शिघ्र कृती दलाचे जवान उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील भंगारामपेठा गावात नक्षलविरोधी अभियान राबवित होते. या अभियानात ३५०० मीटर लांबीचे कार्डेक्स वायर बंडलचे १० नग व इतर नक्षल साहित्य घेऊन काही जण आढळले. त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला.

उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील भंगारामपेठा गावात पोलिस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात उपपोस्टे दामरंचा पोस्टे पार्टी व शिघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना तेलंगणामधून दामरंचा मार्गे छत्तीसगड येथे वाहतूक करीत असलेल्या इसमांकडून १० नग कार्डेक्स वायरचे बंडल एकूण ३५०० मीटर लांबीचे व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आले. येत्या टिसीओसी सप्ताहादरम्यान सदर स्फोटकांचा नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जाण्याचा संशय आहे.

Crime
‘डिजिटल करन्सी’ फसवणुकीचा पर्दाफाश; चार जणांना लोणावळ्यातून अटक

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे राजू गोपाल सल्ला (वय ३१, रा. आसिफनगर, तेलंगणा), काशिनाथ ऊर्फ रवी मुल्ला गावडे (वय २४, रा. भंगारामपेठा ता. अहेरी), साधू लच्चा तलांडी (वय ३०) व मोहम्मद कासिम शादुल्ला (रा. आसिफनगर, तेलंगणा) अशी असून छोटू ऊर्फ सिनू मुल्ला गावडे (रा. भंगाराम पेठा, ता. अहेरी) हा फरार झाला. फरार छोटूचा गडचिरोली पोलिसांकडून शोध करण्यात येत आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, तसेच जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली दामरंचा उपपोस्टेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात पार पडली. सदर कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.

स्फोटकनिर्मितीचे साहित्य

घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी नक्षलवादी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात. नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेल्या कार्डेक्स वायरद्वारे नक्षली बनावटीचे बीजीएल, हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com