सावधान! वर्ध्यात बकरी चोरांची नवी गॅग; आतापर्यंत केल्या घरफोड्या, लांबविल्या दुचाकी

रुपेश खैरी 
Wednesday, 6 January 2021

विशाल चंदू कुराडे, आकाश विलास शिंदे आणि त्यांना सहकार्य करणारा विजय राजू मुळे सर्व रा. वडार झोपडपट्टी असे अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

वर्धा : शहरात बकरी चोरांची नवी गॅंग सक्रिय झाली आहे. या गॅंगमध्ये आतापर्यंत घरफोड्या आणि दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यांचा समावेश आहे. पहिल्याच चोरीत ही टोळी पोलिसांच्या हाती असून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीतील बकऱ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही कारवाई रामनगर पोलिसांकडून करण्यात आली आहे.

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

विशाल चंदू कुराडे, आकाश विलास शिंदे आणि त्यांना सहकार्य करणारा विजय राजू मुळे सर्व रा. वडार झोपडपट्टी असे अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पिपरी (मेघे) येथील हलुमान मंदिर परिसरातील निखिल राऊत यांच्या मालकीच्या 50 हजार रुपये किमतीच्या चार बकऱ्या लांबविल्याची तक्रार रामनगर पोलिसात करण्यात आली. 

या चोरीचा तपास सुरू असताना विशाल कुराडे आणि आकाश शिंदे हे दोघे दुचाकीवर बकऱ्या घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून या दोघांना पोलिसांनी कॉमर्स कॉलेजजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चारही बकऱ्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अधिक माहितीसाठी - गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य

अटक करण्यात आलेल्या चोरट्यांनी पहिल्यांदाच बकऱ्या लांबविल्याचे तपासात पुढे आले. अटकेत असलेल्या या तिघांनी यापूर्वी घरफोडी दुचाकी चोरी आणि इतर चोऱ्या केल्याच्या नोंदी पोलिसात असल्याचे सांगण्यात आले. ही करवाई ठाणेदार धनाजी जळक यांच्या निदोशानुसार पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, पंकज भरणे, लोमेश गाडवे, अजय अनंतवार, अजित सोर, संदीप खरात यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gang thefting Goats in Wardha district