esakal | गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य
sakal

बोलून बातमी शोधा

vehicle burned in untkhana of nagpur crime news

रात्री घरासमोरील मोकळ्या जागेत वाहन पार्क करतात. शनिवारी नागरिकांनी नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला आणि आपापल्या घरासमोर  कार उभ्या केल्या होत्या. मध्यरात्री १ ते २ वाजताच्या सुमारास  अज्ञात आरोपींनी ज्वलनशील पदार्थ कारवर टाकून पेटवून दिल्या. जवळपास दहा ते १२ वाहन रांगेने होते.

गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : संवेदनशील परिसर म्हणून ओळख असलेल्या उंटखाना परीसरात अज्ञान आरोपींनी जाळपोळ करीत राडा घातला. आरोपींनी परीसरात उभ्या कार पेटवून दिल्या. एका कारचा अचानक स्फोट झाला. अचानक लावलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. इमामवाडा पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयटी गार्डन परिसरातील रहिवाशांकडे चारचाकी वाहन आहेत. रात्री घरासमोरील मोकळ्या जागेत वाहन पार्क करतात. शनिवारी नागरिकांनी नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला आणि आपापल्या घरासमोर  कार उभ्या केल्या होत्या. मध्यरात्री १ ते २ वाजताच्या सुमारास  अज्ञात आरोपींनी ज्वलनशील पदार्थ कारवर टाकून पेटवून दिल्या. जवळपास दहा ते १२ वाहन रांगेने होते. एका मागून एक अशा तीन कारला आग लागली. आगीने रौद्र रुप धारण करताच कारच्या आतमध्ये गॅस जमा होवून कारच्या काचा फुटल्या तसेच एका कारचा स्फोट झाल्याने नागरिकांची झोप उघडली. आगीच्या कचाट्यात सापडलेल्या कार पाहून नागरिकांनी आरडा ओरड केली. परिसरातील नागरिक जागे झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या घटनेची माहिती इमामवाडा पोलिसांना देण्यात आली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत संकल्प वानखेडे, अमोल पाटील आणि चिरकुट ताकसांडे यांच्या कार जाळल्या. याप्रकरणी संकल्प वानखेडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - बापरे! गडचिरोली जिल्हा परिषदेत तब्बल १३६३ पदे रिक्त, कामेच होईना

पोलिस आयुक्त घटनास्थळावर -
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः घटनास्थळावर पोहोचले. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी उपस्थित होते. पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, गुन्हे शाखेचे एसीपी सुधीर नंदनवार आणि पोलिस अधिकारी यांनीही घटनास्थळी पाहणी केली. या घटनेची गंभीर दखल घेवून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश अमितेशकुमार यांनी दिले.

सीसीटिव्ही फुटेजची जुळवाजुळव -
आग लावल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंदा साळुंके यांनी घटनास्थळी पोहोचले. घटनेसंबधी नागरिकांशी चर्चा करून आरोपीसंबधी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परिसराती सीसीटिव्ही कॅमेरे आणि परीसराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिस तपासत आहेत. 

हेही वाचा - शेतकऱ्यांनो, पुढील हंगामात पेरणीसाठीही मिळणार नाही...

दोन महिन्यांपूर्वीही घडली होती घटना -
दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची घटना नरेंद्रनगर परिसरात घडली. समाजकंटकांनी दारूच्या नशेत मिळेल त्या गाडीच्या काचा फोडल्या तसेच कार पेटविली. काही तासातच आरोपींना अटक करण्यात आली. आता पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती इमामवाडा पोलिस ठाण्याअंतर्गत उंटखाना एनआयटी गार्डन परिसरात घडली. या घटनेमुळे प्रचंड भीती निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.