
यवतमाळ : इंटरनॅशल गँगस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य कुख्यात भूपेंदरसिंग ऊर्फ भिंडा हा गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळात वास्तव्यास होता. शनिवारी त्याला शहरातील दांडेकर ले-आऊटमधून एलसीबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.