esakal | चंद्रपूर : बल्लारपुरात पुन्हा टोळीयुद्ध, एकाची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रपूर : बल्लारपुरात पुन्हा टोळीयुद्ध, एकाची हत्या

चंद्रपूर : बल्लारपुरात पुन्हा टोळीयुद्ध, एकाची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : सोमवारी रात्री बल्लारपुरातील हॉटेल स्व्केवर पॉइंटजवळ धारदार शस्त्राने मिलिंद बोंदाळे (वय ३२) या तरुणावर हल्ला करण्यात आला. मिलिंदला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा झाला. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या संघपाल कांबळे व धम्मपाल कांबळे गंभीर जखमी झाले. घटनेतील आरोपीला अटक केली असून, दुसरा फरार आहे. मागील काही महिन्यांपासून टोळीयुद्धाने बल्लारपूर हादरले आहे.

सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. भंगार चोरीतून मिळालेल्या पैशाच्या वाटणीतून हा प्रकार घडला. याच वादातून संतापलेल्या सलमान शेख (वय २६) आणि गणेश जंगमवार (वय ४०) या दोघांनी तलवार आणि दगडाने मिलिंदवर हल्ला केला. ही मारहाण सोडविण्यासाठी संघपाल कांबळे आणि धम्मपल कांबळे मधात पडले. हल्लेखोरांना त्यांनाही मारहाण केली. तेसुद्धा जखमी झाले.

हेही वाचा: भिख्खू निवासात पुरुष भंतेने केली महिला भंतेची हत्या

काही महिन्यांत शहरात घडलेल्या बहुचर्चित सुरज बहुरीया, राजू यादव, राकेश बहुरीया तर मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात संदीप ऊर्फ बोग्गा सुरेश दवंडेवार, मारोती शंकर काकडे या हत्यांनी बल्लारपूर हादरले. महिन्याच्या शेवटच्या सलग दोन दिवसांत एक हत्या तर दोन ते तीन गंभीर जखमी अशा वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बल्लारपूर शहर गुन्हेगारीचे केंद्रबिंदू तर बनत चालले नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

शहरात सोमवारी मध्यभागी असलेल्या हॉटेल स्क्वेअर पॉइंट जवळ धारदार शस्त्राने आणि दगडाच्या माऱ्याने दोन हल्लेखोरांनी मिलिंद बोंदाळे या तरुणाला जबर मारहाण केली. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या संघपाल कांबळे आणि धम्मपाल कांबळे हे दोघे भावंड या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेतील एक आरोपी अटकेत तर दुसरा मुख्य आरोपी फरार आहे. पोलिस या आरोपीचा शोध घेत आहे. विशेषबाब म्हणजे, शहरात एका दिवस आधीही अशीच एक घटना घडली होती.

loading image
go to top