

Maharashtra Tree Cutting News Gargai Dam and Coal Mine Projects May Lead to Massive Loss of Forest Cover
sakal
नागपूर : विकास प्रकल्पांच्या नावाखाली देशातील वनसंपदेवर कुऱ्हाड चालण्याची शक्यता पुन्हा एकदा समोर आली. एका धरणासाठी तब्बल तीन लाखांवर, तर कोळसा खाणीसाठी सव्वा लाखाच्या आसपास झाडे तोडण्याचे प्रस्ताव आहेत. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या ९२ व्या बैठकीत सोमवारी विविध राज्यांतील १३३ प्रकल्प प्रस्तावांचा विचार करण्यात आला. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास देशात वृक्षतोड होण्याची शक्यता आहे.