Vishwas Nangare Patil
esakal
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन उभारलं होते. या आंदोलनाची देशभरात चर्चा रंगली. तसेच या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जवर सर्व स्तरांतून टीकाही झाली. याच पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सध्याच्या 'जेन-झी' पिढीबाबत भाष्य करताना गेल्या काही दिवसांपासून आपणही टीकेचे लक्ष्य ठरत असल्याचे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.