
अकोला : कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याकाळात गैरसोय होऊ नये म्हणून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून 2020 या तीन महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा लाभ अकोला जिल्ह्यातील एकूण एक लाख नऊ हजार 776 लाभार्थ्यांना होणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 34 एलपीजी वितरक प्रशासनाच्या सल्ल्यानुसार काम करत आहे. लॉकडाउनच्या काळात पुरेल एवढा एलपीजी साठा सर्वच वितरकांकडे आहे. कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांनी आवाहन केले आहे. एप्रिल महिन्यासाठी घरगुती सिलिंरची रिफिल किंमत उज्ज्वला लाभार्थ्यांच्या लिंक केलेल्या बँक खात्यात अगोदर जमा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या प्रत्येक ग्राहकाला दरमहा एक फ्री सिलिंडर मिळण्याचा हक्क असेल. शेवटचा रिफिल मिळाल्यानंतर 15 दिवसांनी लाभार्थी पुढील रिफिल बुक करू शकतो. रिफिल बुक करताना फक्त आयव्हीआरएस किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाव्दारे करणे आवश्यक आहे. जर ग्राहकांना गॅस बुकिंग करण्यास अडचण येत असेल तर त्यांना गॅस एजन्सीमार्फत मॅन्युअल बुकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहे. ग्राहकांना सिलिंडर मिळविण्यासाठी संबंधित एलपीजी गॅस वितरण कंपनीच्या एजन्सी किंवा गोदामामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांना घरपोच सिलिंडर सेवा मिळणार आहे.
एका महिन्यात एकच सिलिंडर
उज्ज्वाल योजनेतील लाभार्थ्यांना एका महिन्यामध्ये एकच सिलेंडर मिळेल. दुसऱ्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात तेव्हाच मिळतील जेव्हा लाभार्थ्यांनी पहिल्या महिन्याचे सिलिंडर घेतले असेल.
येथे करता येईल उज्ज्वला सिलिंडरची बुकिंग
भारत पेट्रोलियम कंपनीकरिता-7718012345
इंडियन ऑईल कंपनीकरिता- 9623224365
हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकरीता-8888823456
अडचण आल्यास येथे साधा संपर्क
पेट्रोलियम कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर सिलिंडर बुकिंग करण्या संदर्भात काही अडचण आल्यास वा तक्रार असल्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाचा संपर्क क्रमांक 0724-2435117 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.