

Wardha News
sakal
गिरड : गिरड-खुर्सापार जंगल पट्ट्यात मुक्त संचार करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी तब्बल ७० वनकर्मचाऱ्यांचे पथक सलग ६० दिवसांपासून अहोरात्र गस्त घालत आहे. कडाक्याच्या थंडीत, जंगलातील भीषण शांततेत हे पथक रस्त्यावर आणि शेतशिवाराच्या आसपास तैनात आहे. रणधुमाळीपेक्षाही कठीण अशी ही मोहीम वनकर्मचाऱ्यांची खरी परीक्षा घेत आहे.