esakal | Success Story: भाजी विकून आणि वृत्तपत्र वाटून 'तिने' गाठले भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

Girl in wardha district selected for training in Bhabha atomic center

निकिता चौधरीने बारावीत चार विषयात प्रावीण्य प्राप्त केले आहे. तिला 86.93 टक्‍के गुण प्राप्त झाले आहेत. यावर तिने आय.टी.आय. डिप्लोमा मोटर मेकॅनिक हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत आली.

Success Story: भाजी विकून आणि वृत्तपत्र वाटून 'तिने' गाठले भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर

sakal_logo
By
रुपेश खैरी

वर्धा: अंगी जिद्द आणि चिकाटी असली तर बऱ्याच संकटांवर मात करता येते. यातूनच ध्येय गाठणारे व्यक्‍ती आदर्श ठेवतात. असाचा आदर्श वर्ध्याच्या निकिता चौधरी (वय 23) हिने ठेवला आहे. भाजी विकून आणि वृत्तपत्र वितरित करीत शिक्षण घेत तिने भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथे ऍप्रेंटिस ट्रेनिंगकरिता तिची निवड झाली आहे.

निकिता चौधरीने बारावीत चार विषयात प्रावीण्य प्राप्त केले आहे. तिला 86.93 टक्‍के गुण प्राप्त झाले आहेत. यावर तिने आय.टी.आय. डिप्लोमा मोटर मेकॅनिक हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत आली. तिची आई एका किराणा दुकानात नोकरी करते. येथे निवड झाल्यानंतर तिने पेपर वाटताना सायकलवर भाजी विकून आपले शिक्षण गाठले. पुढे मेकॅनिक बनून गाड्‌यांची दुरुस्ती किंवा चालक होण्याचा तिने मनोदय व्यक्त केला आहे.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये ट्रेंनिंगला जाऊन निकिताच्या ज्ञानात अधिकच भर पडणार आहे. तसेच मुंबईला जाऊन तिला प्रत्यक्षात सर्व काही बघण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तिच्या या यशासाठी तिचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. 

जनहित मंचाने केली मदत

जनहित मंचाचे सदस्य किशोर इंगळे व अनिल महाजन यांनी जनहितमंचाचे सदस्यगण यांना आज विश्वासात घेऊन आर्थिक बळ देण्याचा निर्णय घेतला. जनहितमंचाच्या सदस्यांनी हात पुढे करून तिला 14 हजार एक रुपयाची रक्कम तिच्या भविष्याच्या खर्चासाठी दिली. याप्रसंगी जनहितमंचाचे अध्यक्ष सतीश बावसे, पाटनकर, किशोर इंगळे यांनी तिचे कौतुक केले. 

अधिक वाचा - "भूषण शहिद झाला आता दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवणार"; दुःखात बुडालेल्या देशभक्त मातेचे उद्गार

याप्रसंगी डॉ. जयंत मकरंदे, जनहितमंचाचे सदस्य दिनेश रुद्रकार, दिलीप भूत, वासुदेव कोकाटे, सावध, सुधीर ताटेवार, पद्‌म ठाकरे, बोभाटे, अविनाश दरणे, अरुण गालकर, निकिताचे काका, कदम, राजेंद्र सावत आदींची उपस्थिती होती.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image