esakal | अल्पशिक्षित मुलीची नोकरीसाठी धडपड सुरू असताना ढकलले वेश्याव्यवसायात
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पशिक्षित मुलीची नोकरीसाठी धडपड सुरू असताना ढकलले वेश्याव्यवसायात

मुलीने पलायन केल्यानंतर तिच्या आईने मार्च २०१९ मध्ये याची तक्रार केली होती. परिणामी पोलिस तिच्या शोधात असताना तब्बल १८ महिन्यांनंतर मुलगी सुरत येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली.

अल्पशिक्षित मुलीची नोकरीसाठी धडपड सुरू असताना ढकलले वेश्याव्यवसायात

sakal_logo
By
दशरथ जाधव

आर्वी (जि. वर्धा) : घरची परिस्थिती नाजूक असल्याने एक अल्पशिक्षित मुलगी नोकरीच्या शोधात होती. तिचा येथील शुक्‍ला परिवारासोबत संपर्क आला. त्यांनी गुजरात राज्यातील सुरत येथे आमचा व्यवसाय असल्याची बतावणी करून चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले अन् पुढील घटनाक्रम घडला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्‍यामप्रसाद गणेशकुमार शुक्‍ला (वय ४५), जयश्री ऊर्फ ज्योती शुक्‍ला (वय ४०) व चेतन ऊर्फ अंकित रामसेवक गौतम यांच्याकडे मदतीसाठी युवती आली. ती नोकरीच्या शोधात होती. या दाम्पत्याने तिला नोकरीचे आमिष दाखवले. तिला येथील बसस्थानकावर बोलाविले.

जाणून घ्या - 'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित

मुलीला विठ्ठल वॉर्डातील चेतन ऊर्फ अंकित गौतम याच्या घरी ठेवले. त्या रात्री अंकितने तिच्यावर अत्याचार केला आणि दुसऱ्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे जयश्री ऊर्फ ज्योती हिच्या भावाकडे सोडले. येथून ज्योती ऊर्फ जयश्री हिने तिला आपल्या सोबत ट्रेनने गुजरात राज्यातील सुरत येथे नेले.

येथे मुलीला काही दिवस घरकाम करायला लावले. मात्र, त्यानंतर तिला मारहाण करून अवैध व्यवसाय करण्यास भाग पाडले. शुक्‍ला परिवाराच्या तावडीतून सुटण्यासाठी तिने हिंमत करून पलायन केले. यानंतर तिची भेट कलाईचे काम करीत असलेल्या आशीष यादव यांच्यासोबत झाली. त्यानंतर तिने त्याच्या सोबत घरोबा केला.

असे का घडले? - तो रडकुंडीस येऊन म्हणतो, दादाऽऽ दादाऽऽ रिक्षात बसा ना; हृदय हेलावून टाकणारा संघर्ष

मुलीने पलायन केल्यानंतर तिच्या आईने मार्च २०१९ मध्ये याची तक्रार केली होती. परिणामी पोलिस तिच्या शोधात असताना तब्बल १८ महिन्यांनंतर मुलगी सुरत येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रवींद्र खेडेकर, किशोर ताकसांडे व नंदागवळी यांनी सुरत गाठले. मुलीसह आशीष यादव याला ताब्यात घेतले. यावेळी केलेल्या तपासात शुक्‍ला परिवाराचे कृत्य उघड झाले.

दोन मुलींचे अपहरण केल्याचा गुन्हा

सन २०१३ मध्ये सावळापूर व स्थानिक साईनगरमधील दोन मुलींचे अपहरण केल्याचा गुन्हा शुक्‍ला परिवारावर दाखल आहे. संजयनगर व जनतानगरमधील मुलींना सुरत येथे नेऊन त्यांना अवैध व्यवसायाला लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कविता फुसे व रवींद्र खेडेकर तपासणी करीत आहेत. अनेक प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्‍यता आहे.

क्लिक करा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

तीन आरोपींना अटक

नोकरीचे आमिष दाखवून २०१९ मध्ये मुलील सुरत येथे नेले. तेथे गेल्यानंतर भलतेच घडले. नोकरी तर मिळाली नाही. मात्र, वेश्‍या व्यवसायात तिला ढकलले. तिने यातून स्वत:ला मोठ्या शिताफीने सोडवून एका मुलासोबत राहणे सुरू केले. तब्बल १८ महिन्यांनंतर नाट्यमयरीत्या या प्रकरणाच्या चौकशीला दिशा मिळाली आणि पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे