ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पहाटे आले सत्य समोर

सतीश दहाट
Thursday, 17 September 2020

वाहनांची झडती घेतली असता त्यात गोवा कंपनीच्या व्हिस्की ३६ पेट्या आढळून आल्या. त्याची किंमत दोन लाख सोळा हजार रुपये तर कारची नऊ लाख असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कामठी (जि. नागपूर) : नवीन कामठी पोलिसांनी बुधवारच्या मध्यरात्री एचआर ३६-एएच ०२७१ या चारचाकी वाहनासह ११ लाख सोळा हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. यात दोन लाख सोळा हजार रुपये किंमतीची गोवा व्हिस्की कंपनीच्या दारूचे ३६ बॉक्सचा समावेश आहे. एका आरोपीस अटक करण्यात आली असून, दोन आरोपी फरार झाले. यानंतरची नाट्यमय घडामोड पुढील प्रमाणे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजताच्या सुमारास नवीन कामठी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना नागपूर जबलपूर मार्गावरील जयस्तंभ चौकात डिझायर कार क्रमांक एचआर 36-एएच ०२७१ क्रमांकाचे वाहन संस्थयीत स्तिथीत फिरताना दिसून आले.

सविस्तर वाचा - सुसाईड नोटमधील शब्द... ‘मरायला कुणाला आवडते होऽऽ, मला पण जगायचं होत’ पण...

तिला थांबविण्याचा प्रयत्न केला असता रेल्वे स्टेशन मार्गाने पळून जाऊ लागले. पेट्रोलिग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशनला फोन करून इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले व मोटर स्टँड चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या मार्गावर वाहन थांबवले.

मात्र, वाहन थांबविताच दोन इसम पळून गेले तर एक चंद्रशेखर चिंतामण यादव (२२, रा. हाऊसिंग बोर्ड, सीतारामनगर, जि. भिलाई, छत्तीसगढ) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता ते सापडले नाही.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

वाहनांची झडती घेतली असता त्यात गोवा कंपनीच्या व्हिस्की ३६ पेट्या आढळून आल्या. त्याची किंमत दोन लाख सोळा हजार रुपये तर कारची नऊ लाख असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कार्यवाही परिमंडळ क्रमांक पाचचे डीसीपी सहायक पोलिस आयुक्त विक्रम साळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल, दुय्यम पोलिस निरीक्षक राधे पाल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सुरेश कन्नाके, पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजा टाकलीकर, सुरेंद्र शेंडे, सुधीर कनोजिया यांनी केली.

क्लिक करा - सत्तावीस वर्षीय युवक स्मशानघाटासमोरून गाडी ढकलत घेऊन जात होता, पुढे...

ते होते रडत

पोलिसांनी कारवाई केल्यानंतर माल जप्त करीत होते. दुसरीकडे दोघे पोलिसांची कारवाई बघून रडत होते. काही नागरिकांना ते रडताना दिसले. मात्र, ते कशासाठी रडत होते हे त्यांना समजल नाही. दुसऱ्यादिवशी वृत्तपत्रात वृत प्रकाशित झाल्यानंतार त्यांच्या रडण्याचे कारण समजले. मात्र, तोपर्यत वेळ निघून गेली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol smugglers caught by police