esakal | अन्‌ त्यांची प्रेमकहानी राहिली अधुरी, प्रेयसीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

अन्‌ त्यांची प्रेमकहानी राहिली अधुरी, प्रेयसीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरोरा (जि. चंद्रपूर) : कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे रात्रीच्या सुमारास प्रेमीयुगलाने पलायन केले. दरम्यान, शेतातून जात असताना तारांच्या कुंपनातील विद्युत प्रवाहाच्या धक्‍क्‍याने प्रेयसीचा मृत्यू झाला. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यालाही धक्का बसला, मात्र तो बचावला. ही दुदैवी घटना तालुक्‍यातील माजरा (रै) येथील शेतशिवारात घडली. प्रियकराने घटनेची माहिती स्वतः:च्या वडिलांना सांगितल्यानंतर घटना उजेडात आली.
वरोरा तालुक्‍यातील खैरगाव येथील कोमल रामभाऊ गराटे (वय 19) महाविद्यालयात प्रथम वर्षाला होती. हेमंत बाळकृष्ण दडमल (वय 23 रा. निंबाळा ता. भद्रावती) याच्याशी तिचे प्रेमसबंध होते. हेमंत मूळचा भद्रावती तालुक्‍यातील होता. त्याचे मामा खैरगाव येथे वास्तव्याला आहेत. त्यामुळे तो खैरगावला नेहमी यायचा. दरम्यान, त्याचे कोमलशी नाते जुळले. मागील तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसबंध सुरू होते. कुटुंबीयांचा या संबंधाला विरोध होता. त्यामुळे दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. हेमंत खैरगावला आला होता. रात्रीच्या सुमारास दोघेही घरातून पळून गेले. कुणाच्या नजरेत येऊ नये म्हणून त्यांनी शेताचा मार्ग निवडला. मजरा (रै) येथील एका शेताला जंगली श्‍वापदांपासून वाचविण्यासाठी तारेचे कुंपण केले होते. याच तारेच्या कुंपणातून जाण्याचा प्रयत्न करीत असताना कोमलला विजेचा जोरदार धक्का लागला. ती किंचाळल्याने हेमंतने तिला ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला सुद्धा विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का इतका जोरदार होता की, कोमलचा जागेवरच मृत्यू झाला. रात्रीच्या अंधारात मदतीसाठी कुणीच नव्हते. सर्वत्र स्मशान शांतता होती. घाबरलेल्या हेंमतने या घटनेबाबत कुणालाही सांगितले नाही. रात्रभर तो अंधारात एकटाच कोमलच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. पहाट उजाडल्यानंतर त्याने भ्रमणध्वनीवरून वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी वरोरा पोलिस ठाण्यात झाला प्रकार सांगितला. लगेच पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीचे अभियंता विनोद कुमार भोयर घटनास्थळी पोहचले.
या घटनेत प्रियकर हेमंत दडमल, शेतमालक सुरेश रामचंद्र गेडाम व विठ्ठल रामचंद्र गेडाम यांना पोलिसांनी अटक केली.

loading image
go to top