केवढी हिंमत, तिने त्याचीच काठी घेऊन त्यालाच बदडले, हे होते कारण... 

girlfriend hit her boyfriend with a stick on the road
girlfriend hit her boyfriend with a stick on the road

अमरावती : प्रेम माणसाला काय काय करायला लावते याचा काही नेम नाही. जर हे प्रेम दोन्हीकडून असले तर दोघेही काहीही करण्यास तयार असतात. परंतु जर प्रेम एकतर्फी असेल तर दुसऱ्याची चांगलीच पंचायत होते. असाच काहीसा प्रकार आज (ता. 29) अमरावतीत घडला. तरुणीने धारण केलेले विक्राळ रूप आणि तिची कृती पाहून उपस्थितही अवाक्‌ झाले. दिवसभर अमरावतीत याच प्रकरणाची चर्चा होती. 


ते दोघे समवयीन असल्याने वारंवार भेटीगाठी व्हायच्या. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. परंतु हे प्रेमप्रकरण फार काळ टिकू शकले नाही. सहा महिन्यांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला. परंतु, तिच्याकडून प्रेम कायम होते आणि ती आपल्या निर्णयावरही ठाम होती. त्याने दिलेल्या नकारामुळे ती संतापली. तो सतत टाळाटाळ करीत असल्याने काय करावे आणि काय नाही, असे तिला वाटत होते. तो समोर आल्यावर त्याला काय म्हणावे आणि काय नाही, याच विचारात ती सतत असायची. 

ती काही वर्षांपासून अमरावतीत भाड्याच्या खोलीत राहते. उदरनिर्वाहासाठी एका दुकानात नोकरी करते. तिचा हा मित्र फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहतो. अमरावतीत असताना त्या दोघांचे सूत जुळले. युवकाचे वडील खासगी नोकरी करतात. त्या दोघांच्या भेटीगाठी मध्यंतरी वाढल्या. सहा महिन्यांपासून त्याने तिच्यापासून दूर राहणे पसंत केले. तिचा नंबरसुद्धा ब्लॉक करून ठेवला. कारण ती युवकापुढे लग्नाची मागणी करीत होती. तो टाळत होता, मात्र ती आपल्या मागणीवर ठाम होती. 

असा घडला प्रकार 

तो आपल्याला सतत टाळत असल्याने आज जाब विचारायचाच या हेतूने विद्यापीठ मार्गावरील बियाणी चौकात एका व्यापारसंकुलासमोर बुधवारी (ता. 29) दुपारी अडीचच्या सुमारास तिने त्याला बोलावले. ती दुपारी दोनपासून बियाणी चौकात व्यापारसंकुलाजवळ त्याची वाट पाहत होती. तिने दुसऱ्या फोनवरून कॉल केल्यानंतर दोघांनी भेटायचे ठरवले. ज्यावेळी तिने फोन केला तेव्हा तो मार्डी येथे मित्राकडे गेला होता. तिच्या फोनमुळे तो वडिलांची दुचाकी घेऊन बियाणी चौकात पोहोचला. तिने पुन्हा त्याच्याकडे लग्नाची मागणी रेटून धरली. परंतु आता मला लग्नात अडकायचे याच शब्दावर तो ठाम होता. यावरून त्यांच्यात बरीच शाब्दिक चकमक होऊन चौकातच वाद वाढला व झटापट झाली. अनेकांनी हे दृश्‍य बघितले. राग अनावर होऊन तिने त्याच्या दुचाकीवर असलेली काठी हिसकावून त्याला बदडणे सुरू केले. सर्वांसमोर होत असलेल्या प्रकारामुळे तरुणाला काय करावे अन्‌ काय नाही असे झाले. आपला प्रियकर ऐकत नसल्याचे पाहून द्विधा मन:स्थितीत असलेल्या युवतीने स्वत:ही औषधाच्या गोळ्या खाल्ल्या. यामुळे ती रस्त्यात बेशुद्ध झाली. तिला काही लोकांनी उचलून पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याला ताब्यात घेऊन गाडगेनगर ठाण्यात बसवून ठेवले. 
 

औषधांच्या ओव्हरडोसमुळे तरुणी बेशुद्ध 
एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गोळ्या खाल्ल्याने औषधांचा ओव्हरडोस झाला. गोळ्या एकाचवेळी खाल्ल्याने युवतीची प्रकृती गंभीर झाली. इर्विनमध्ये तिला दाखल केले. तिचे बयाण नोंदविले नाही. तक्रार दिल्यास ताब्यात असलेल्या युवकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल. 
-मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com