esakal | स्थानिकांनाच उमेदवारी द्या
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानिकांनाच उमेदवारी द्या

स्थानिकांनाच उमेदवारी द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : कामठी असो वा रामटेक आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या चारही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक तसेच कार्यकर्त्यांनी स्थानिकांनाच उमेदवारी देण्याची आग्रही मागणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांच्याकडे केली. यामुळे अनेक दिवसांपासून मतदारसंघ ठरवून कामाला लागलेले काही बडे नेते अडचणीत आले आहेत.
मुकुल वासनिक यांनी सोमवारी आपल्या बंगल्यावर विधानसभा उमेदवारीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक सुमारे दोन वर्षांपासून रामेटक बांधत आहे. याच मतदारसंघावर एकदा राष्ट्रवादीकडून लढलेले ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे पुत्र अमोल देशमुख यांनीही दावा केला आहे.
मुकुल वासनिक यांनी सावनेर, कामठी, रामटेक, उमरेड येथील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी कामठी, उमरेड व रामटेकमधून मोठ्या संख्येत सक्रिय कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. कामठीमधून 11 इच्छुकांनी दावा केला आहे. कार्यकर्त्यांनी कामठीतून स्थानिकच उमेदवार द्यावा अशी मागणी करण्यात आली. काहींनी कामठीतून सावनेरचे आमदार सुनील केदार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी रेटल्याचे समजते. कामठीमधून नाना कंभाले यांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांच्या मागणीला जोर देत नावाची चर्चा घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यामुळे सुरेश भोयर याचे नाव मागे पडले. रामटेकमध्येही स्थानिक मुद्दा रंगला, आमच्यावर वरून लादलेला उमेदवार देऊ नका, अशी मागणी झाल्याने अमोल देशमुख यांच्यासह राजेंद्र मुळक यांचीही दावेदारी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. उमरेड मतदारसंघात 13 इच्छुकांनी दावा केला आहे. येथे कार्यकर्त्यांनी स्थानिक व सर्वांना चालेल असा उमेदवार द्यावा अशी मागणी केली. संजय मेश्राम व राजू पारवे हे उमरेडमधून लढण्यासाठी पूर्ण ताकद लावून तयारी करीत आहेत.
loading image
go to top