विष प्राशनाचा पोस्टमार्टम अहवाल हवाय! मग मारा अमरावतीच्या चकरा

postmartem akola.jpg
postmartem akola.jpg

अकोला : पोस्टमॉर्टम अहवाल देणे हे घटनेवर अवलंबून आहे. जळालेल्या व्यक्तीचा पोस्टमॉर्टम अहवाल तातडीने देता येतो. शस्त्रांनी हत्याकांड घडल्यास या हत्याकांडाचा अहवालही तातडीने देता येतो. यामध्ये अहवाल देण्यास काहीही अडचण नसताना मात्र विष प्राशन केल्यानंतर विष किडनी तसेच लिव्हरमध्ये गेल्यास त्याचा अहवाल केमिकल लॅबकडून येतो. याच लॅबकडून वर्षानूवर्षे हा अहवाल प्राप्त होत नसल्याचे बोट सर्वोपचार प्रशासनाने अमरावती येथील फॉरेंसिक लॅबकडे दाखविले आहे. असे जरी असले तरी मात्र, अशा प्रकरणाचा तपास करतांना पोलिस विभागाला अडथळा निर्माण होत आहे.

जिल्ह्यात घडणारे हत्याकांड, आत्महत्या, तसेच कौटुंबिक कलहातून झालेल्या हत्या प्रकरणात मृतदेहाची उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले जातात. हा वैद्यकीय अहवाल पोलिस तपासाठी अत्यंत महत्वाचा असल्याने या अहवालाची पोलिस विभागाल नितांत गरज असते. मात्र, हत्याकांड, गळफास घेऊन आत्महत्या यासोबतच कौटुंबिक कलहातून जाळून घेणे या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल देण्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तत्परता जरी दाखवतात.

तरी मात्र, विष प्राशन करून झालेल्या आत्महत्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट हा अमरावती येथील फॉरेन्सिक लॅबकडूनच घ्यावा लागत असल्याने हा वैद्यकीय अहवाल वर्षानूवर्षे मिळत नसल्याची ओरड पोलिस विभागाकडून केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांने अमरावतीकडे बोट दाखविले असून, ही प्रक्रीया संथ वरून गतीमान कशी करता येईल याकडे मात्र, लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांना येतात अडचणी
विष प्राशन प्रकरणातील वैद्यकीय अहवाल वेळेवर मिळत नसल्याने न्यायालयात याप्रकरणात ठोस पुरावे सादर करण्यास तांत्रिक बाबींची अडचण येते. यामुळे पोलिसांना प्रचंड अडचणी येत आहेत. दोन ते तीन दिवसात पोस्टमार्टेम अहवाल येणे अपेक्षित असताना विष प्राशन झालेल्या प्रकरणात काही महिने वाट पहावी लागत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढते.

इतर पोस्टमॉर्टमचे अहवाल तातडीने
विष प्राशन केल्यानंतर विष किडनी तसेच लिव्हरमध्ये गेल्यास त्याचा अहवाल केमिकल लॅबकडून येतो. त्यामुळे त्याला काही दिवस वेळ लागू शकतो; मात्र इतर पोस्टमॉर्टमचे अहवाल तातडीने देण्यात येतात.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com